Winter Lok Sabha Session : लोकसभेने आज गुरुवारी काँग्रेस व इतर पक्षांच्या 14 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित भागातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी काँग्रेस खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पाच खासदारांना निलंबित करण्यात आले होते आणि आता आणखी नऊ खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे.
या खासदारांना निलंबित करण्यात आले
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. या ठरावात टीएन प्रतापन, हिबी इडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे या पाच सदस्यांना गैरवर्तनामुळे निलंबित करण्यात आले. यावेळी बी. महताब सभागृहाच्या अध्यक्षस्थानी होते.
यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. यावर सभापती बी महताब यांनी काँग्रेसच्या इतर नऊ खासदारांनाही निलंबित केले. यामध्ये बेनी बेहानन, व्हीके श्रीधरन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी करुणानिधी, के सुब्रमण्यन, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांच्या नावांचा समावेश आहे.
#WATCH | Opposition MPs- Benny Behanan, VK Sreekandan, Mohammad Jawed, PR Natarajan, Kanimozhi Karunanidhi, K Subrahmanyam, SR Parthiban, S Venkatesan and Manickam Tagore-suspended from Lok Sabha for the rest of the session for "unruly conduct"
— ANI (@ANI) December 14, 2023
House adjourned till tomorrow. pic.twitter.com/gThKY50P7P
खासदार हनुमान बेनिवाल यांनी स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला
गुरुवारी लोकसभेत संसदेच्या सुरक्षेतील कुचराईच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राजस्थानमधील आरएलपी पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. अमित शहा यांनी सभागृहात येऊन या विषयावर विधान करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली.