Tuesday, November 5, 2024
Homeक्रिकेटआशिया कप मध्ये विराट कोहली सचिनचा हा मेगा रेकॉर्ड तोडणार?…जाणून घ्या कोणता?…

आशिया कप मध्ये विराट कोहली सचिनचा हा मेगा रेकॉर्ड तोडणार?…जाणून घ्या कोणता?…

न्यूज डेस्क : येत्या बुधवार पासून आशिया कप ला सुरुवात होणार आहे. यासाठी भारताची टीमही सज्ज आहे. या आशिया कपमध्ये भारताचा फलंदाज विराट कोहली अनेक रेकॉर्ड रचणार आहे. तो पुन्हा एकदा आशिया चषक 2023 पूर्वी इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे, आणि ही भारतीय टीम साठी खरोखरच मोठी उपलब्धी आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील 13,000 धावा. आणि हा आकडा गाठून विराट कोहली तेंडुलकर आणि कांगारूंचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग यांच्या पंक्तीत सामील होईल. आणि यासाठी विराटला फक्त 102 धावांची गरज आहे. आणि यात शंका नाही की, विराट आशिया कपमध्येच ही कामगिरी करेल. ही कामगिरी करून विराट हा पराक्रम करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरणार आहे.

विराटच्या आधी सचिन, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्या हेच फलंदाज आहेत ज्यांनी हे काम केले आहे. आणि आता लवकरच विराट कोहलीचेही नाव या क्लबमध्ये लिहिले जाणार आहे. त्याचबरोबर कोहलीला सचिनला मागे टाकून वेगवान तेराह हजारी बनण्याचीही संधी असेल. सध्या वेगवान तेरा हजार सचिन तेंडुलकर आहे, ज्याने हा आकडा गाठण्यासाठी 321 डाव खेळले आहेत, तर कोहलीने सचिनला मागे टाकण्यासाठी जवळपास 265 डाव खेळले आहेत.

विराट कोहली आतापर्यंत 274 वनडे खेळला आहे. या सामन्यांच्या 265 डावांमध्ये त्याने 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 46 शतके आणि 56 अर्धशतके झळकली आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: