मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपू्वीच भावी आमदारांच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये विधानसभेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात भावी उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. या पक्षात बाहेर जिल्ह्यातून आलेले उमेदवारही आहेत. ते विधानसभा मतदारसंघात नाव करण्यासाठी मतदारसंघात होर्डिंग व वाढदिवस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करत आहेत तर या उमेदवाराच्या भरोशावर काही हौशी नेतेही आपली हौस भागवून घेत आहेत. जातीयवादी नेते अशी त्यांची प्रतिमा असून ते त्यांना दोन जातीचा फार मोठा राग आहे, त्यांचा पैसा चालतो मात्र माणूस नाही. असा नेता आपला वाढदिवस भावी आमदाराच्या पैश्यातून मोठ्या वाज्यागाज्यासह साजरा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मग भावी आमदारही मोठा पैसेवाला असल्याचे भासवून मतदारसंघात पैशाची लूट करतो.
बाहेर जिल्ह्यातून आलेलं हे पार्सल आधी भाजपमध्ये एका पदावर होते तर स्वतच्या जिल्ह्यातील मतदारसंघात निभाव न लागल्याने त्यांनी थेट राखीव असलेला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ गाठला, मूर्तिजापूर विधानसभेत असं त्यांच कोणतेही कार्य नसून अचानक निवडणुकीपूर्वी प्रकट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्षही बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने तेही उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करतात की काय? तर या भावी उमेदवाराला राष्ट्रवादीमध्ये कोणी आणले? आणि मुर्तिजापूर मतदार संघ त्यांना कोणी सुचवला हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण विधानसभ मतदार संघ हा खूप मोठा आहे. यामध्ये बार्शिटाकळी व अकोला तालुक्यातील गावे असल्याने हा पार्सल उमेदवार या ठिकाणी चालणार नसल्याचे येथील मतदार सांगतात.
तर या मतदारसंघात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काम करत असलेले भावी उमेदवार आपल्याला तिकीट मिळणार या आशेवर काम करत आहे. मात्र हे पार्सल उमेदवार बाहेर जिल्ह्यातून येऊन एका लालची नेत्याला खुश करून त्याची हौस पूर्ण करून आपलं नाव पुढ करण्याचा केविलवाला प्रयत्न करत आहे. हा लालची नेता कोणत्याही उमेदवाराला निवडून आणण्याची कुवत नसून सुध्दा भावी उमेदवार त्याचे बळी पडतात. अश्या लालची नेत्यांमुळे विधानसभेत कमी बुद्धीचे प्रतिनिधी निवडून येतात आणि मतदार संघाचा सत्यानाश करतात. मात्र अश्या पार्सल उमेदवाराला तिकीट मिळाली तर त्याची अवस्था विल्हेकर यांची जशी झाली होती तशी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.