Sunday, December 22, 2024
Homeराजकीयपारस येथे ६६० मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार...

पारस येथे ६६० मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार – आमदार अमोल मिटकरी…


पारस प्रकल्पातील अधिकारी बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची अभ्यासपूर्व सकारात्मक चर्चा कंत्राटी कामगार शेतकरी प्रकल्पग्रस्त राखी संबंधी कोळसा मनारखेड प्रकल्प बाधित भागात रोड पिण्याचे पाणी संरक्षण भिंत यासंबंधी नागरिकांशी सविस्तर चर्चा…. (पारस वार्ताहर) पारस येथे होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या विरोध असल्याने त्यासंबंधी बाळापुर चे तहसीलदार नायब तहसीलदार औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता आणि पारस येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी 2011 मध्ये संपादित केलेली तीनशे दहा एकर शेती दिलेले शेतकरी बेरोजगार गावकरी प्रकल्प बाधित गावातील शेतकरी नागरिक यांच्यामध्ये चर्चा घडवून पारस येथे औष्णिक प्रकल्प कसा उभारला जाईल आणि त्या संबंधी यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून औष्णिक वीज प्रकल्पपारस ते औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा संकल्प आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प काही तांत्रिक बाबीमुळे होऊ शकला नाही परंतु भूसंपादन केलेल्या शेत जमिनीमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम शासनाकडून हाती घेतले आहे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा या सौर ऊर्जा प्रकल्पास तीव्र विरोध असून यासंबंधीचा पाठपुरावा विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अभ्यास पूर्व व सविस्तर माहितीसह सरकार समोर मांडला या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण होऊन पारस येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या शेत जमिनीमध्ये औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून गावकरी वर्गाकडून अकोला जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्याकडून होत आहे.

पाच पाच जानेवारी 2024 रोजी यासंबंधी एक बैठक पारस येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस मध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी संबंधित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पारस येथील अधिकारी बाळापूर येथील तहसीलदार राहुल तायडे प्रकल्पाचे मुख्य अभियंता शरद भगत उपमुख्य कार्यकारी अभियंता गट्टूवार बांधकाम अभियंता पटिया व इतरही अधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.

बैठकीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करून पारस येथे ६६० मेगावॅट औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कसा उभारला जाईल यावर सविस्तर चर्चा केली त्याचबरोबर संबंधित महानिर्मितीची कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून प्रकल्पाविषयी सर्व माहिती जाणून घेतली स्थानिक शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध असल्याचे शेतकऱ्यांचे मतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले शासनाने केलेला न्याय निवाडा यामध्येही भूसंपादन केलेली जमीन ही 660 मीटर प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

एवढे असल्यावरही केवळ अल्पशा कारणामुळे पारस येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प रेंगाळलेला आहे आणि शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी नसतानाही शेतकऱ्यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने उभारण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे असा शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप असून सरकारच्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे अकोला जिल्हाधिकार्यालयासमोर सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकरी मंडळी गावकरी यांनी लाक्षणिक उपोषण नुकतेच केले आहे.

शासनाने जर या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही तर सर्व जिल्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट विचाराही शेतकरी यांनी दिला आहे याबाबतही आमदार मिटकरी यांनी संबंधित विभागाला माहिती दिली आहे एकंदरीत सर्व बाजू ऐकून घेऊन शासनाला पारस येथील भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 660 चा प्रकल्पच उभारल्या जाईल असे आश्वासन अमोल मिटकरी यांनी दिले.

याप्रसंगी शिवसेनेचे संहसंपर्कप्रमुख संदीप पाटील किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र लांडे पारस कृती समितीचे श्रीकृष्ण इंगळे मनोहर आप्पा कारंजकर रमेश भगत किसनराव दांदळे वाहेदभाई निलेश बिल्लेवार प्रशांत मानकर विनीत भारसाकडळे प्रवीण चिकटे गोपाल कराळे पारस व परिसरातील शेतकरी गावकरी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: