Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsगेल्या १० वर्षापासून भाजपचा शाब्दिक उद्धार करणारे रवी राठी यांना भाजप कार्यकर्ते...

गेल्या १० वर्षापासून भाजपचा शाब्दिक उद्धार करणारे रवी राठी यांना भाजप कार्यकर्ते साथ देतील का?

पार्टी विथ डिफरन्स समजल्या जाणाऱ्या भाजप पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा असल्याचं काल पाहायला मिळालं कारण या पक्षात काहीही होऊ शकते किंवा हा पक्ष काही करू शकतो हे गुवाहाटीच्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती पडलं. पूर्वी हा पक्ष फार शिस्तीचा समजल्या जात होता. मात्र कालच्या एका वृताने भाजप मधील अनेक कार्यकर्त्यांची मने दुखावल्याची घटना समोर आली आहे. उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि थेट भाजप मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर रवी राठी यांना मूर्तिजापूर विधानसभेची उमेदवारी मिळाल्यांच्या अफवांचा बाजार सुरु झाला आणि शहरात एकच जल्लोष रवी राठी यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गेल्या दोन-तीन महिन्यापासून राष्ट्रवादीच्या भावी उमेदवारांनी स्वतःला उमेदवारी मिळविण्यासाठी नाना प्रकारचे कार्यक्रम नाना प्रकारच्या योजना राबविल्या गेल्या मात्र राष्ट्रवादीने सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले. आणि कालच त्याचा एक प्रयोग झाला आणि सम्राट डोंगरदिवे पुढे मोठ आव्हान उभ केल. कालच रवी राठी यांनी भाजप पक्षातप्रवेश केला आणि आपल्याच तिकीट मिळणार अश्या बातम्या सुद्धा पसरवल्या. अश्यातच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षासोबत एकनिष्ठ काम करीत आहेत त्यांना बुचकळ्यात पडण्याची वेळ आली. दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या प्रचारावेळी खासदारापासून ते पंतप्रधानापर्यंत शाब्दिक उद्धार करणारे रवी राठी आता यांच्यासाठी खरच प्रचार करतील का? भाजप निष्ठावतांना डावलून नव्यानेच पक्षात आलेल्या त्या व्यक्तीला तिकीट देणार का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

मूर्तिजापूर विधानसभेची जागा धोक्यात असल्याने या जागेवर बदल होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. तर विद्यमान आमदारांना जशी याची चाहूल लागताच त्यांनी नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याजवळ करण्याचा प्रयत्न सुरू केले एवढेच काय तर नव्याने नवयुवकांना पक्षात प्रवेश करून त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून पक्ष श्रेष्ठींचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्या गेला मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला. पक्ष वाढवण्यासाठी मी काम करत आहे असे दाखवण्यात सुद्धा आले मात्र तरी सुद्धा त्यांची तिकीट धोक्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षात आमदारांनी फक्त बदनामी शिवाय दुसरं काही या मतदारसंघात केलं नसल्याचे लोक त्यांच्यावर ठपका ठेवतात. म्हणूच रवी राठी यांना संधी देणार असल्याचे रवी राठी यांचे समर्थक सांगतात.

तर याबाबत आता तालुका भाजप कार्यकारणी तसेच जिल्ह्यातील काही कार्यकारणीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. तर या बैठकीत काय निर्णय होणार हे हे एक दीड तासात बाहेर येईलच परंतु आता नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना पक्ष कसा सांभाळेल आता हे सुद्धा पहावे लागेल सोबत हरीश पिंपळे यांचे नाराजी असल्याने त्यांच्या समर्थक हे रवी राठी यांना मदत करतील का? मात्र तिकिटाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने हे तिकीट कोणाला हे कधीही जाऊ शकते आणि एक वेगळेच नाव समोर येऊ शकते…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: