विधानसभा निवडणूक येत्या तीन-चार महिन्यावर येवून ठेपल्या. त्याआधीच सोशल मिडीयावर एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये येणाऱ्या विधानसभेतील सर्वच पक्षातील इच्छुक उमेद्वारींची यादी असून स्वताचे नाव पाहून भावी आमदार गद्गद होत आहे तर जवळच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगून तो संदेश फिरवायला सांगत आहे. तर मूर्तिजापूर विधानसभेकरिता सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे तर भाजप तर्फे फक्त मोजकेच नावे आहेत त्यापैकी बोर्टा या गावातील सरपंच पंकज सावळे व अकोल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे यांची नावे चर्चेत आहेत. बाकी इतरही नावे आहेत मात्र चर्चा या दोन नावांची जास्त आहे. काही प्रसिद्धी पिसाट कट्टर हिंदू असल्याचा खोटा दिखावा करून भाजप लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यावेळी भाजप कोणतेही रिस्क घेणार नसल्याचे समजते.
मागील निवडणुकीत भाजपचे हरीश पिंपळे यांचा फार कमी मतांनी विजय झाला होता, हरीश पिंपळे यांच्या बद्दल मतदारसंघात बरीच नाराजी असल्याचे बोलले जाते. सोबतच भाजपच्या सर्वेत ही हरीश पिंपळे बद्दल नाराजीचा सूर दिसून आल्याने यावेळेस या मतदार संघात नक्कीच बदल होणार असे संकेत मिळत आहे. तर हरीश पिंपळे नाही तर दुसरा कोण? असाही सवाल भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात सुरू आहे. मात्र भाजपा हा एक मोठा ब्रांड आहे, पिंपळे नव्हे. हा मतदार संघ जेव्हा पासून राखीव झाला तेव्हा पासून एकाच अनुसूचित जातीच्या उमेदवाराला संधी दिल्या गेली यामध्ये बाकीचे अनुसूचित जातीचे उमेदवार वंचितच राहिले. विशेष म्हणजे त्यांच्या अनुसूचित जाती समूहाचे मतही अल्प आहे तरीसुद्धा वारंवार एकाच उमेदवाराला संधी भाजप देत आहे. हा प्रश्न इतर अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पडला आहे. या मतदारसंघात चांभार जातीचे 15000 च्या वर मतदार आहेत. तरीपण त्यांना एक वेळही संधी दिली नाही. अनुसूचित जातीतील बौद्ध तर दूरच राहिले त्यामुळे हे समाज भाजपा पासून दुरावत चालले आहेत. त्यांना जवळ करण्यासाठी भाजपाकडे ही मोठी संधी आहे. मात्र यावेळी भाजप आणि संघ हे दोघेही उमेदवारांबाबत निर्णय घेणार आहे. भाजप यावेळी राज्यात सर्वच समाजातील लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळणार आहे तर असाच बदल मुर्तिजापूर मतदारसंघातही होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
मुर्तिजापूर मतदारसंघात यावेळी भाजपला आव्हान देणारे प्रमुख पक्ष एक वंचित दुसरा महाविकास आघाडी या दोन्ही पक्ष कोणते उमेदवार देणार यावरही भाजपचा विजय ठरविला जाणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्षातील एक बाहुबली ‘सम्राट’ उमेदवार आहेत. जर त्यांना महाविकास आघाडीचे तिकीट मिळाले तर मग भाजपचे काही खर नाही. मागील वेळेस वंचितच्या उमेदवाराने विसाव्या फेरीपर्यंत मजल मारली होती मात्र निसटता पराभव वंचितला पत्करावा लागला यावेळेस वंचित पुन्हा अवचार ताईंना तिकीट देणार? जर दिले तर यावेळी मतदारसंघातील चित्र बदलणार. दुसरीकडे भाजपाचे आमदार हे मतदारसंघातील जनतेसोबत उद्धटपणे वागतात, अशी मतदार संघात चर्चा आहे. मागील आठवड्यात तर थेट एका वारकऱ्यालाच मारण्याची धमकी दिली होती. याची audio क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्यामुळे याचा काही प्रमाणात फटका भाजपला बसणार असल्याने भाजप यावेळी सावध भुमिका घेणार आहे. मतदारसंघात भाजप नवा उमेदवार देणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे तर कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.