गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) तुकुम सायगाव येथे एकता नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित “करंडा कुंकवाचा” या तीन अंकी नाटकाचा उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सैनिक कैलास पुस्तोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आदिवासी बहुल क्षेत्रातील व गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले आपले छोटेसे गाव, आपल्या छोट्याशा गावात आपण मंडई निमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला.संपुर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेऊन आपण आपल्या गावाच्या एकतेचे दर्शन घडवुन आणले.हि फार कौतुकास्पद बाब आहे.P
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या या अतिदुर्गम भागात असलेल्या समस्या, अपुरे रोजगार,अल्प भूधारक शेतकरी यामुळे आपण आजही विकासापासून वंचित आहात, आपल्या या भागात शासनाच्या विविध योजना, विविध उपक्रम आपल्या पर्यंत पोहचवुन, शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवुन त्याची क्रयशक्ती कशी वाढवता येईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहणार.असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे, रांकापा विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, फुलचंद बागडेरीया, माजी सभापती तानेश ताराम, सरपंच जयश्री मस्के, नामदेव लांजेवार,संजय कांबळे,प्रितम रामटेके, रहमान खा पठाण,रेखाबाई पालीवाल तथा गावकरी व नाट्यरसिक उपस्थित होते.