Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayखरच आता सर्वच पत्रकारांना टोलमाफी मिळणार का?…PIB ने ट्वीट करून दिली 'ही'...

खरच आता सर्वच पत्रकारांना टोलमाफी मिळणार का?…PIB ने ट्वीट करून दिली ‘ही’ माहिती…टोल टॅक्समध्ये कोणाला सूट मिळते?

आता पत्रकारांना महामार्गावरून प्रवास करताना टोल टॅक्स भरावा लागणार नसल्याचे अनेक संदेश Whatsapp व्हायरल होतात. आणि बरेच सुज्ञ पत्रकही या संदेशाला बळी पडतात आणि पुढे पाठवितात. आता पुन्हा असे मेसेज सुरु झाल्याने PIB ने याबाबत fact check केले आहे. PIB ने ट्वीटकरून याबाबत सांगितले आहे.

पीआयबीने याबाबत ट्विट केले आहे. पीआयबीने आपल्या अधिकाऱ्याने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘एक व्हॉट्सएप संदेश दावा करत आहे की पत्रकारांना भारतातील सर्व टोल प्लाझावर टोल टॅक्समधून सूट मिळेल, ज्यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवणे आवश्यक असेल.’ तथापि, हा दावा खोटा आहे. तद्दन बनावट आहे, असे PIB सांगितले आहे.

पीआयबीने तथ्य तपासणीनंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. MORTHIndia ने असा कोणताही आदेश दिलेला नाही. त्याचबरोबर याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://morth.nic.in/sites/default/files/faqs_exemptions.pdf या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता, असे सांगण्यात आले.

टोल टॅक्समध्ये कोणाला सूट मिळते?
PIB ने एक लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये भारतात टोल टॅक्समधून कोणाला सूट देण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली आहे. त्यात भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे राज्यसभा अध्यक्ष आणि खासदार इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच रुग्णवाहिका आणि श्रवण वाहनांनाही टोल टॅक्समधून सूट देण्यात आली आहे.

तुम्ही कोणताही संदेश स्वतः तपासू शकता
सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा व्हॉट्सएपवर येणाऱ्या बातम्यांबाबत तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही पीआयबीद्वारे तथ्य तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकवर जावे लागेल. याशिवाय, तुम्ही 8799711259 या व्हॉट्सएप क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवरही माहिती पाठवू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: