पातूर – निशांत गवई
आजच्या समाजात प्रत्येक आघाताने महिलांच्या नशिबी विधवापन येते.यामुळे समाजात त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने पाहतात.तसेच कोणताही कार्यक्रम असला तर त्याना मान सन्मान देण्यासाठी सुद्धा कोणीही पुढाकार घेत नाही.
परंतु वाडेगावात समाजा पुढे आदर्श निर्माण करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने विधवा महिला साठी २६ जानेवारी २०२३ रोजी गुरुवार गणतंत्र दिवस क्रांतिकारक प्रजापती दिवशी डॉक्टर सुभाष भुस्कुटे यांचे घरी एक क्रांतिकारक पाऊल उचलून विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्यासाठी सुद्धा सवश्न ( सुहासिनी )महिला बरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
असा कार्यक्रम परिसरातील पहिलाच असून सर्व प्रथम कार्यक्रमात वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन करण्यात आले. आणि विधवा महिलांना सुद्धा सन्मान आणि आमंत्रित करण्यात आले. त्यांचा सन्मान देऊन सुहासनी असल्याचा भास या कार्यक्रमात दिसून आला.
त्यांच्या सोबत सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन सन्मान करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमात महिलांची भरपूर उपस्थिती विलक्षण होती. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुमती भूस्कुटे ,सौ मंगला भुस्कुटे ,सौ मिनल भुस्कुटे ,सौ डॉक्टर मनीषा भुस्कुटे (मसने) यांनी केले.या कार्यक्रमामुळे परिरात कौतुक होत आहे.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा स्त्रियांच्या सन्मानाचा दिवस असून या मध्ये विधवा महिलांना न बोलवून त्यांना स्त्री सन्मानापासून दूर ठेवण्यासारखे आहे .त्यामुळे विधवा महिलांना या कार्यक्रमांमध्ये सन्मानित करून बोलवण्यात यावं जेणेकरून विधवा महिलांना सन्मानाने जगता यावं. ही प्रथा मोडीत काढून हा कार्यक्रम ठेवण्यात आला.
डॉ मनीषा सुश्रुत भुस्कुटे (मसने)