पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दिग्रस बुद्रुक येथील ५५ वर्षीय विधवा महिलेवर चाकूने हल्ला करून हत्या झाल्याची घटना गुरुवार रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा कैलास गवई ह्या दिग्रस बुद्रुक येथील रहिवासी असून कुटूंबा सोबत आनंदी व सुखी जीवन जगत होते.
अशातच जेठ असलेल्या आरोपीने महिलेच्या घरात जाऊन ठार झालेल्या महिलेच्या मानेवर पाठवीर आदी ठिकाणी वार केल्याचे आढळून आल्याचे दिसुन आले. चान्नी पोलिसांना माहिती पडताच पोलिसांनी घटना स्थळ गाठून तसेच १०८ च्या रुग्णवाहिके वरील डॉक्टर मुदतशीर यांनी पाहणी करून तत्काळ उचलून रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगावध्ये आणले असता प्राथमिक आरोग्य बंद दिसून आले.
तशीच रुग्णवाहिकेचे वाहन चालक जिवन इंगळे यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता हल्ला केलेल्या महिलेला मृत घोषित केले.या घटने बाबत चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महाजन ,सुनील भाकरे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे.
तसेच आरोपी वाडेगाव कडे पायी जात असतानाच चान्नी पोलिसांना आरोपीला अटक केल्याचे सांगण्यात आले आहे.मृत महिलेच्या मागे दोन मुली,दोन मुले,सून नातवंड असा बराच आप्त परिवार आहे. मोठा मुलगा राहुल हा जम्मू काश्मीर येथे सैन्यात कर्त्यावर आहे. वृत्त लिहेपर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता..