Monday, December 23, 2024
HomeराजकीयED सरकारसाठी सुशांत सिंग राजपूत एवढे महत्वाचे का?...

ED सरकारसाठी सुशांत सिंग राजपूत एवढे महत्वाचे का?…

राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून जनतेचे महत्वाचे प्रश्न बाजूला सारून दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणावर जास्तच जोर देत असल्याने सामान्यांना विविध प्रश्न निर्माण होत आहेत. एवढेच नाही तर याचा आवाज नागपूरपासून दिल्लीपर्यंत गेला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरी संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. सुशांत सिंग राजपूत हा बिहारचा रहिवासी होता. तेव्हा हा मुद्दा चर्चेत आला होता. पाटण्यामध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत पोहोचले तेव्हा त्यावरून जोरदार राजकीय गोंधळ उडाला होता. सुशांत सिंग मृत्यू प्रकरण आजही बिहारच्या लोकांना भावनिकरित्या दुखावते. आता पुन्हा एकदा ED सरकार यात स्वत:साठी संधी शोधत आहे का?…

राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी सुशांत प्रकरण विधानभवन संकुलात आणि लोकसभा सदस्य राहुल शेवाळे यांनी संसदेत उपस्थित केले. ‘AU’ हे संक्षेप असलेल्या एका व्यक्तीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अनेक फोन कॉल केल्याच्या दाव्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे खासदार शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीच्या स्टेटस रिपोर्टची माहिती मागवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शेवाळे यांनी दावा केला होता की ‘एयू’ने रिया चक्रवर्ती यांना 44 फोन केले होते.

AUच्या बहाण्याने सुशांत राजपूत मृत्यू प्रकरण चर्चेत

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी विधानभवन परिसरात निदर्शने केली. त्यांच्या हातात बॅनर होते, ज्यावर ‘ऐ कौन है’ असे लिहिले होते. खासदार शेवाळे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ‘AU’ कोण आहे हे शोधून काढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

खरे तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. आता महाविकास आघाडी विरोधात आहे. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. म्हणून विरोधकांना AU प्रकरणात गुंतून ठेवण्यासाठी राज्यातील चाणक्याची हि चाल असल्याचे बोलल्या जाते. तर दुसरीकडे BMC निवडणुकीत मुंबईतील बिहारी लोकांना खुश करण्यासाठी ED सरकार ही चाल खेळत असल्याचे बोलले जाते.

म्हणूनच शिंदे गटातील आमदार-खासदारांनी ‘AU’चा मुद्दा उपस्थित केल्याचे मानले जात आहे. ‘अ’ म्हणजे आदित्य आणि ‘उ’ उद्धव असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

AU म्हणजे अनाया उदास – रिया चक्रवर्ती

ठाकरे गटानेही शिंदे गटाला पलटवार केला. संजना घाडी नावाच्या नेत्याने रिया चक्रवर्तीच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. रिया चक्रवर्तीची ही जुनी मुलाखत आहे, एक मिनिट 27 सेकंदाच्या क्लिपमध्ये रियाने AU बद्दल स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये रिया म्हणते की एयू म्हणजे तिची एक मैत्रीण अनाया उदास आहे. तिच्या मित्रानेही हे स्पष्टीकरण दिले आहे. रिया म्हणाली की मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही किंवा भेटलो नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: