Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayइंग्लंड विजयाचा जल्लोष साजरा करतांना मोईन अली आणि आदिल रशीद यांना बटलरने...

इंग्लंड विजयाचा जल्लोष साजरा करतांना मोईन अली आणि आदिल रशीद यांना बटलरने का हटविले…जाणून घ्या कारण…

ICC T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात केली. या विजयानंतर, जेव्हा इंग्लंडचा संघ ट्रॉफीसह पोज देण्यासाठी व्यासपीठावर बसला तेव्हा प्रथम ट्रॉफीसह आनंद साजरा करण्यात आला, कर्णधार जोस बटलरने ट्रॉफी धरली आणि त्याच्या शेजारी आदिल रशीद आणि मोईन अली होते तर त्यांना खाली जायला सांगितले.

तर विजयाचा जल्लोष हा शॅम्पेन उडवून साजरा करायचा होता त्याआधीच कॅप्टन जोस बटलरने आदिल आणि मोईनला निघून जाण्यास सांगितले. ते दोघेही उशीर न करता खाली आले आणि नंतर शॅम्पेन उडवून सेलिब्रेशन साजरे करण्यात आले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. जोस बटलरने केलेल्या कृतीचे सर्वजण कौतुक करीत आहे.

इस्लाममध्ये अल्कोहोल निषिद्ध आहे आणि या कारणास्तव बटलरने मोईन आणि आदिलला आगाऊ चेतावणी दिली, त्यानंतर दोघांनीही व्यासपीठ सोडले.

इंग्लंडने अंतिम सामन्यात 138 धावांचे लक्ष्य 19 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केले. अशाप्रकारे पाकिस्तान टी-20 विश्वचषक विजेतेपदाला मुकले. इंग्लंडच्या सॅम करनला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: