न्यूज डेस्क – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील स्थानिक नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरातला नेण्याबाबत आणि शेजारील राज्यातून चांगले प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, सरकारने कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थानिक लोकांशी चर्चा केली पाहिजे.
स्थानिक लोकांचा एक वर्ग रिफायनरीला विरोध करत आहे. किंबहुना, कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेवर तसेच तेथील उपजीविकेवरही याचा परिणाम होईल असे त्यांना वाटते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ठाकरे म्हणाले…माझ्याकडे कागदपत्रांचा गठ्ठा आला होता. ग्रामपंचायतीचे ठराव आहेत असं मला सांगण्यात आलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच माझ्याच काळातील एअर बस आणि वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का दिले? हा प्रकल्प गुजरातला न्या. वेदांत फॉक्सकॉन इतर प्रकल्प महाराष्ट्राला द्या. गिफ्ट सिटी महाराष्ट्राला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला दिल्या. इतर प्रकल्प आम्हाला दिल्या आहेत, असं ते म्हणाले.
आम्ही सर्व दादागिरीच्या विरोधात उभे आहोत. लोकांना न सांगता प्रकल्प लादला जात आहे, असं काय आहे या प्रकल्पात? असा सवाल त्यांनी केला. या प्रकल्पामुळे बारसूतील कातळ शिल्पाचं नुकसान होईल. जागितक वारसा स्थळावर रिफायनरी नकोच. सरकारने स्थानिकांशी संवाद साधावा. हुकूमशाहीनं प्रकल्प लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल. रिफायनरीसाठी डोकी फोडण्याचा घाट घातला जात आहे, असंही ते म्हणाले.
यापूर्वी ठाकरे यांनी बारसू-सोलगाव परिसरात सभा घेण्याचे नियोजन केले होते, मात्र त्यासाठी परवानगी मिळू शकली नाही.