Friday, November 22, 2024
Homeराज्यमहायुतीत बाळापुर मतदार संघ कोणाच्या वाटेला जाणार, चर्चेला उधाण...

महायुतीत बाळापुर मतदार संघ कोणाच्या वाटेला जाणार, चर्चेला उधाण…

पातूर – निशांत गवई

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून हळूहळू विधानसभेचे वातावरण तापद आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेकांनी उमेदवारी करता गुडघ्याला बाशिंग बांधले होते भाजपाने पहिली यादी नुकतीच जाहीर केली परंतु बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये तीन पैकी कोणत्या पक्षाला जाणार याबाबत अनेक तर्क विर्तक लावल्या जात आहे व चर्चेला उधान आले असून दोन माजी आमदार उमेदवारी मिळणार करीता मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत बाळापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्याकरिता जिवाचे रान करीत असल्याचे चर्विचा आहे.

बाळापूर विधानसभा धानसभा मतदारसंघ हा कोणाचा वाटेला जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत
बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु २०१९ निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या पदरात पाडून घेतला होता व विजय सूध्दा मिळवला होता.

त्यावेळी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार नितीन देशमुख हे विजयी झाले होते परंतु गेल्या अडीच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर बाळापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वि
द्यमान आमदार नितीन देशमुख यांना आमदारकीचे तिकीट पक्के समजले जात आहे परंतु त्यांना महायुतीकडून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण येणार या चर्चेला उधाण आले आहे.

कारण 2019 च्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने यावेळी सुद्धा शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवतील अशी चर्चा आहे दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार हे शिंदे गटांकडून उमेदवारीची मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत महायुती कडुन शिवसेना शिंदे गट गटांकडून उमेदवारीची मागणी करीत आहेत त्यासोबतच नव्याने हा मतदारसंघ भाजपाकडे सोडण्यात यावा अशी मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून होत आहे व भाजपाकडून उमेदवारी मागण्याकरिता दहा वर्षे आमदार राहिलेले माजी आमदार हे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असून त्यांनी भाजपा पदाधिकारी व नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

भाजपाने नुकतीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये अकोला जिल्ह्यातील एकमेव उमेदवार जाहीर केल्याने बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये कोणाच्या वाटेला जाणार या चर्चेला मोठे उधान आले आहे 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे खेचून घेतला होता व संग्राम गावंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी चे उमेदवार होते त्यामुळे आता अजितदादा गट हे महायुतीत असल्याने 2019 च्या फार्मूला नुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याकडे यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे त्यांनी सुद्धा याकरिता मुंबई येथे जाऊन अजितदादा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेटी घेतल्या असल्याची चर्चा आहे त्यामुळे महायुतीमध्ये बाळापुर विधानसभा मतदारसंघावर भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या मध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार या चर्चेला उधान आले आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे
नितीन देशमुख यांचे उमेदवारी निश्चित मानली जात आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये हा मतदार संघ कोणाच्या वाटेला जाणार या याकडे सुद्धा अनेकांचे डोळे लागले आहेत कारण जातीय व राजकीय समीकरण निर्माण करून या मतदारसंघांमध्ये कोणाची टक्कर कोणासोबत राहील हे महायुतीतील येणाऱ्या उमेदवारावर अवलंबून आहे.

कारण बाळापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहेत एकंदरीत सध्या तर महायुती मधून बाळापूर विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याकडे सर्वांचे डोळे लागले असून बाळापुर विधानसभा मतदारसंघात अनेक तर्क वितर्क व चर्चेला विदर्भ उदान आले आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी रांग असून एका दोन वेळा बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या एका माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून मतदार संघ आपल्या पदरात पाडण्याकरिता प्रयत्नशील आहेत तर भाजपाच्या वतीने सुद्धा पुन्हा हा मतदारसघ भाजपाच्या वाटेला यावा याकरिता सुद्धा पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

भाजपाचे उमेदवारी मिळण्याकरिता एका माजी आमदाराने सुद्धा मुंबईतील भाजपाच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केले आहेत येत्या एक ते दोन दिवसांमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला गेला याची चित्र स्पष्ट होणार आहे त्यानंतर या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार हे सुद्धा समोर येणार असल्याने सध्या तरी बाळापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीकडून मतदारसंघ कोणाला मिळणार या चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: