वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळला अन् केली शालेय साहित्याची मदत…
मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
म्हणतात ना ” जसे बीज तसे फळ ” याचाच प्रत्यय आणून दिला किनखेडच्या विधान उभाळे या चिमूकल्याने आपल्या वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळला आणि अपघातात निधन झालेल्या गावातीलच एका व्यक्तीच्या मुलांना शालेय साहित्याची मदत केली.
तालुक्यातील किनखेड (कामठा) येथील रहिवाश गजानन मोटर ड्रायव्हिंग स्कूल मूर्तिजापूरचे संचालक प्रविण उभाळे हे सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होऊन विविध उपक्रमाचे आयोजन करत असतात आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने मुलावर संस्कार रुजवून समाजाबद्दलची प्रेम निर्माण केले त्यामुळे मुलाने सुद्धा समाजाप्रती प्रेम दाखवत समाजाचा घटक म्हणून आपण समाजाचा काही देणं लागतो या उदात्त हेतूने गावातील सुभाष भोंडे यांचे काही महिन्याअगोदर रेल्वे अपघातात निधन झाले होते.
त्यांना दोन मुलं आणि पत्नी असा आप्त परिवार आहे आणि कुटुंबप्रमुख गेल्यानंतर त्या कुटुंबाची काय हाल अपेष्ठा भोगाव्या लागतात हे सर्वांना ठाऊक असल्याने त्या मुलाने आपला वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून त्या मुलांना शालेय साहित्याची मदत केली व समाजापुढे आदर्श निर्माण केला यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी विधानचे वडिल प्रविण उभाळे,आई पूनम उभाळे ,जालीम खान पठाण, प्रमोद टाले,रवी म्हसाये तुलसीदास गोरले,अमोल गावंडे जगताराम महल्ले यांच्यासह विधानचा मित्र परिवार उपस्थीत होते.