मूर्तिजापूर विधानसभेत कालच १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आता उरले १५ उमेदवार त्यापैकी फक्त चारच उमेदवार मैदानात टिकणार असल्याचे बोलले जाते. मागील एका बातमीत महाव्हाईस न्यूज ने जे भाकीत केले होते, तशीच लढाई आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी भाजप विजय निश्चित सांगता येत जरी नसला तरी काट्याची टक्कर यावेळी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ४८ तासात तीन पक्ष बदलले त्या उमेदवाराला अवघे ५ हजार मते सुद्धा मिळणार नसल्याचे येथील मतदार सांगत आहे. कारण मतदार आपले मत वाया जाऊ देणार नसल्याचे सांगत आहे. तर येत्या दोन तीन दिवसात मतदार संघातील जनेतचा काय कौल असणार आहे. यासाठी महाव्हाईस न्यूजची टीम संपूर्ण मतदार संघाच ग्राउंड रिपोर्ट करणार आहे.
विधानसभा निवडणुकीत २०१९ प्रमाणेच पक्षीय बलाबल असल्याने पुन्हा त्याच पक्षात लढत असल्याचे बोलल्या जाते, त्यामुळे गत निवडणुकीचे समीकरण असल्याने विविध गोटात राजकीय चर्चा रंगत आहेत. निवडणुकीपूर्वी जो मतदार संघात कार्यक्रमाचा सपाटा सुरु केलेल्या उमेदवाराची हवा आता फुस्स झाल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्या फेकू कृत्यामुळे त्याच्या सभांची गर्दी ओसरल्याचे दिसत आहे. आता तो उमेदवार चवथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याचे सध्या दिसत आहे. निवडून येणारा उमेदवार चक्क आता चवथ्या क्रमांवर गेल्याने आता त्याच डिपॉझिट वाचणार कि नाही अशी शंका मतदारांना आहे. सुरुवातीला मोठा पैशेवाला दाखवून सर्वच समाजातील लोकांना जवळ केलं, मात्र अनेकांना त्याच्या मूळ स्वभावाचे दर्शन होताच कार्यकर्ते दूर व्हायला लागले. त्याच्या कार्यक्रमाला गर्दी पाहून त्याला पक्षाच तिकीट मिळाल. मात्र आता त्याच्या सोबतच गर्दी ओसरल्याचे दिसत आहे. आता पुन्हा नाराज कार्यकर्त्यांना जवळ करण्याची त्याची कला आता निकामी होणार आहे. याचा फायदा वंचितच्या उमेदवाराने घेतला असून या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना जवळ करून आपलं पाठबळ वाढवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वंचित सध्यातरी प्रथम क्रमांकावर असल्याचे लोक सांगतात.
तर दुसरीकडे भाजपच्या आमदाराविषयी विधानसभा मतदारसंघात असलेली नाराजी तर आता आमदार हरीश पिंपळे यांनी दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना जवळ करण्याची मोहीम सुरु केली असून त्यांना यात बरेच यश आले आहे. मात्र आता ते कार्यकर्ते अगोदर सारखे प्रामाणिक काम करतील का? यावर राजकीय तज्ञांना शंका आहे. असे असले तरी गटबाजीच्या राजकारणाने भाजपासाठी या मतदारसंघात म्हणावी तेवढी ही निवडणूक सोपी राहिली नाही. त्यातही गेल्या दशकात स्थानिक मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे पडला असल्याने महत्त्वाचे विकास मुद्दे सुटले असल्याची चर्चा जनमानसात आहे. विशेष म्हणजे मूर्तिजापूर आणि आणि बार्शीटाकळी या दोन्ही शहरातील पाणी प्रश्न जैसे थे असल्याने याबाबत जनतेची प्रचंड नाराजी असल्याचे दिसत आहे. आता आमदारांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोन्याच्या ताटात जरी जेवण वाढलं तरी कार्यकर्ते ते जेवायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपला कार्यकर्तेसह मतदाराना समजावण्यातच वेळ जाणार असल्याने तोपर्यंत दुसराच बाजी मारणार असल्याचे राजकीय तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे भाजपला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची जी भीती होती ती आता राहली नसून आत फक्त भाजपच्या मतदाराना आपल्या कडे कसे येतील जी आता शिल्लक आहे. उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची मोठी जाहीर सभा होणार आहे मात्र या सभेचा मतदारांवर किती फरक पडणार हे २३ तारखेला निकालाच्या दिवशीच माहिती पडणार…