Saturday, September 21, 2024
Homeराज्यतंबाखू खाणाऱ्यानो जरा जपून घोटा..! नांदेड मध्ये बनतोय बनावट तोटा…!

तंबाखू खाणाऱ्यानो जरा जपून घोटा..! नांदेड मध्ये बनतोय बनावट तोटा…!

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनीअवैध धंद्याविरुद्ध कारवाई करत मोठया प्रमाणात बनावट सूर्यछाप तंबाखू बनविणारे साहित्य जप्त करून एकूण 19,75,200 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे.त्यामुळे तंबाखू खाणाऱ्यानो जरा जपून घोटा…नांदेडमध्ये बनतोय बनावट तोटा असे ऐकावंयास मिळत आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या बाबत आदेशीत करण्यात केले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा येथील गुन्हेशोध पथकास दिनांक 29 मार्च 2024 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण हद्दीतील मिल्लतनगर एम.जी.आर गार्डन येथे बनावटी सुर्यछाप जर्दा साठवुन ठेवल्या बाबत गोपनिय माहीती मिळाली.

त्यावरुन मिल्लतनगर येथे जावुन पोलिसांनी रेड केला असता तेथे बनावट व्ही.एच. पटेल आणि कंपनी चाळीसगाव जिल्हा जळगांव या कंपनीच्या तोटयावरील हबेहुब दिसनारे लोगो, त्यावरील चिन्हे, आकृत्या, नावे वापरुन आरोपीने स्वःता चे आर्थिक फायदयासाठी बनावट सुर्य छाप टोटा तंबाखू भरण्यासाठी पुंगळ्या, त्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद,

बनावट सुर्य छाप टोट्याचा पुड्या पॅक करण्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद, सुर्य मुखाचे चिन्हे असणारे प्रिंन्टेड कागद बनावट सुर्य छाप टोटाचे पॅकींग केलेले टोटयाचे पूडे व त्यासाठी वापरण्याचा नकली तंबाखू, तसेच गुटखा, बिडी यांचे प्रिंन्टेट कागद व पॉलीथीन असा एकुन 19,75,200/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.

यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 258/ 2024 कलम 328,468,471,34 भादवी गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड नेमणुक इतवारा पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,नांदेड अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारीउपविभाग इतवारा नांदेड व उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोनाअर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजु सिटीकर यांनी केली असुन त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: