९० टक्के नागरीकांना रॉंग साईड शिवाय पर्याय नाही…
प्रेतयात्रेलाही जावे लागते महामार्ग ओलांडून…
रामटेक – राजु कापसे
रामटेक – नागपूर जबलपूर महामार्गावर देवलापार, पवनी अपघाताचे स्थळ बनले आहे.या मार्गावर धावणाऱ्या वाहनाचे प्रमाण मोठे असून वेग मात्र अनियंत्रीत असतो.त्यामुळे गावातच मोठ्या प्रमाणात अपघात होवू लागले आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे महामार्ग ओलांडणे किंवा रॉंग साईडने चालने किंवा वाहन चालविणे हेच आहे.परंतू महामार्ग प्राधिकरण याकडे लक्ष देईल की आणखी लोकांचे जीव घेईल अशी चर्चा होत आहे.
देवलापारचा मार्ग तयार होवून चार ते पाच वर्ष झाली असली तरी परीसरात देवलापारातच अनेक अपघात घडले आहे.त्याा अनेक अपघात हे रॉंग साईडने चालल्याने झाला. येथे पूर्वेला ३० टक्के वस्ती असून पश्चिमेला ७० टक्के लोकवस्ती आहे. ये जा करण्याकरीता प्रत्येकाला महामार्ग ओलांडूनच जावे लागते. तर वाहन घेवून जातांन दोन किलोमिटरचा वेढा घ्या नाहीतर रॉंग साईडने जा हाच पर्याय राहतो त्यामुळे नागरीक लवकर पोहचण्याकरीता जीव मुठीत घेवून रॉंग साईडने जातात.
देवलापार व पवनी येथे दोन्ही ठिकाणी रोड मंजूरीच्या वेळी उड्डाण पुल मंजूर होते परंतू काही राजकीय दबावाखाली ते रद्द करण्यात आले. जर उड्डाण पुल असते तर या अपघाताच्या घटनेला प्रतिबंध लावता आला असता. परंतू याकडे लक्ष कोण देणार हा प्रश्न निर्माण होत आहे. ये उड्डाण पुल झाला तर या बाबींवर तोडगा निघू शकतो.महामार्ग उभारण्याआधी येथे रस्त्याच्या कडेला दुकाने होती. त्यातील बऱ्यापैकी व्यापाऱ्याची दुकाने जैसे ते आहे परंतू काही लहान दुकाने जागेअभावी बंद पडली त्यामुळे अनेक लहान दुकानदार बेरोजगार झाले असुन त्यांचे खायचे सुद्धा वांदे आहे अशी परीस्थीती अनेकांवर ओढावली आहे.
दोन ठिकाणी फुड ब्रीज पर्याय नाहीच
देवलापारच्या दोन्ही बाजूला फुड ब्रीज तयार करण्यात आले आहे. या ब्रीजचा वापर एका बाजुने शाळा असल्याने काहीसा वापरला जातो परंतू ग्रामिण रुग्णालया जवळचा ब्रीज तर शो पीसच आहे. त्याचा कोणीही वापर करीत नाही. त्यामुळे तो विनाकारण उभारण्यात आल्याचे दिसुन येते.
आठवडी बाजाराच्या दिवशी चांगलीच वर्दळ
मंगळवारी आठवडी बाजार भरतो. हेच परीसरात मोठे गाव असल्याने परीसरातील १५ ते २० गावातील नागरीक येथे बाजाराकरिता येतात. बाजार गावाच्या पूर्वेस भरतो. त्यामुळे या भागातील नागरीकांना बाजारात जाण्याकरीता रस्ता ओलांडूनच जावे लागते. गाड्या भरधाव चातल असल्याने जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो.
उड्डाण झाल्यास अपघाताचे प्रमाण कमीच होणार
येथे उड्डाण पुल झाल्यास अपघाताचे प्रमाण शुन्यच होईल, विद्यार्थ्यांना अंडरपासने जाता येईल, ज्या लहान व्यापाऱ्याचे दुकान गेले त्यांना पून्हा व्यवसाय उभारता येईल. नागरीकांना इकडून तिकडे सहज जाता येईल. प्रेतयात्रा सहज जाईल.याशिवाय अनेक फायदे होणार असल्याने येथे उड्डाण पुल गरजेचा आहे.