मालेगाव (वाशिम)- चंद्रकांत गायकवाड
शिरपूर जैन येथील जवळच असलेल्या वाघी बुद्रुक परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे मागील चार ते पाच वर्षापासून या परिसरात सातत्याने वृक्षतोड होत आहे. याकडे कोणीतरी लक्ष देणे खूप गरजेचे आहे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रकारे ढिक पडलेले आहेत.
शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा की हवामानात सातत्याने बदल होत आहेत व तापमानाने सातत्याने वाढत आहे ही आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारे वृक्षतोड केली नाही पाहिजेत जेणे करून भविष्यात आपल्याला पाणीटंचाई भासणार नाही या परिसरात खूप मोठ्या परिसरात खूप मोठा प्रमाणात वृक्षतोड सतत चालू आहे तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे.तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इढोळे यांचे मत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन छेडणार..