प्राथमिक सुविधांअभावी नागरिक त्रस्त
बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर शहरात अनेक प्राथमिक सुविधा अभावी शहरावासी त्रस्त होत असून शहरात नाले सफाई, कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच स्ट्रीट लाईट आदी कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत असून अनेक भागात कचऱ्याचे ढिग लागत असून वेळोवेळी नाल्याची साफसफाई सुद्धा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे तर नाल्यामध्ये अडकलेल्या कचऱ्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन त्रास दायक ठरत आहे.
तसेच शहरातून वाहनाऱ्या मन व महेश नदी मध्ये कित्तेक दिवसापासून जलकुंभी व जलपर्णी ने बस्तान मांडल्याने अनेक वेळा मागणी करूनही दोन्ही नद्यांची साफसफाई करण्यात येत नसल्याने दोन्ही नदी पत्रामध्ये अडकलेल्या जलकुंभी मधे घान कचरा अटकत असल्याने दोन्ही नघांमधील पाणी दुषीत होऊन ऐन पावसाळ्याचे दिवसांत पाण्यामध्ये दुर्गंधी येत आहे.
तर डासांची सुद्धा संख्या वाढून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतू या सर्व बाबीकडे पालीका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून या बाबींकडे लक्ष देण्यास झोपलेल्या नगर पालीका प्रशासनाला केव्हा जाग येईल व शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कामांकडे प्रशासन केव्हा लक्ष देईल असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत असून नागरिकामध्ये रोष निर्माण होत आहे.