मूर्तिजापूर पंचायत समितीचे अधिकारी वेळेवर कामावर हजर नसतात, अश्या बर्याच तक्रारी प्राप्त होतात मात्र दिलेले काम वेळेवर न करणे, वेळ मारून नेणे असे प्रकार काही अधिकारी करीत असल्याने शेवटी कंटाळून याबाबत शेतकरी संघटनेचे नेते सुरेश जोगळे यांनी पंचायत समितीचे BDO यांच्या धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, पंचायत विभागाकडे गेल्या वर्ष भरात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामधील बऱ्याच प्रकरणात अद्याप पर्यंतही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निश्चितच ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. तसेच मा. पालकमंत्री यांचे कडून प्राप्त तक्रारी सुद्धा बऱ्याच कालावधी पासुन प्रलंबित असून आपण त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही निश्चितच ही बाब आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्चिन्ह निर्माण करणारी आहे.
ग्रामपंचायत हातगाव येथील तक्रारीची चौकशी बऱ्याच दिवसापासून आपल्या कडे प्रलंबित असल्यावरही त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच आपल्या सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येथील तक्रारी सुद्धा बऱ्याच कालावधी पासुन प्रलंबित आहेत. निश्चितच ही सुद्धा गंभीर स्वरूपाची बाब आहे. आपण ग्रामपंचायतीला भेटी देत नसल्याने तसेच त्याची सखोल तपासणी करीत नसल्याने व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी योग्य ती कारवाई पार पाडत नसल्यानें फार मोठया स्वरूपात तक्रारी प्रलंबित आहेत. तसेच पालकमंत्री महोदय यांच्या तक्रारीवरून कार्यवाही बाबत कोणताही ताळमेळ आपल्या कडे उपलब्ध नाही. सदर प्रलंबित तक्रारीची अनुशंगणे गंभीर प्रकरण उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल याची कटाक्षनाने नोंद घेण्यात यावी.
याद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की, मा. पालकमंत्री यांचेकडील प्राप्त सर्व तक्रारीवर आपण केलेल्या कार्यवाही व प्रलंबित तक्रारीचा अहवाल तसेच ईतर ग्रामपंचायती वरील प्राप्त तक्रारीवर केलेल्या कार्यवाही व प्रलंबित तक्रारीचा अहवाल दिनांक ०८/०२/२०२४ पर्यंत माझ्या समक्ष उपस्थित राहुन सादर करावा. तसेच आपणास वारंवार सुचना देऊनही आपण संभाव्य व प्रतेक्ष दौरा दैंदिनी कार्यालयास सादर करत नाही.
माझ्या असे निदर्शनास आले आहे की. आपण वरिष्ठांचे आदेशांचे पालन करीत नसुन मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहात. तरी उपरोक्त बाबीस आपणास जबाबदार धरून, आपणास महाराष्ट्र जिल्हापरिषद जिल्हा सेवा (वर्तूनुक) नियम १९६७ चानियम ३ चा भंग केल्यामुळे आपल्या विरुद्ध महाराष्ट्र जिल्हापरिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियमातील तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाही का कऱण्यात येऊ नये? तसेच माहिती अधीकारस अर्जास विलंब झाल्यास आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये? याबाबतचे अपले स्पष्टीकरण उलट टपाली सादर करावे. आपले स्पष्टीकरण विहित मुदतीमधे प्राप्त न झाल्यास अथवा सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळून आल्यास आपल्या विरुद्ध प्रशासकीय कारवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच, पालकमंत्री यांचे प्राप्त तक्रारी प्रथम प्राधान्य देऊन निकाली काढावी. याबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी…
सुरेशभाऊ जोगळे
शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अकोला.