मिलिंद खोंड
गडचिरोली:
परीला पंख असतात असं आपण बालपणी ऐकलं आहे .मात्र महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरीला गडचिरोली जिल्ह्यात पंख फुटल्याचे (छप्पर हवेत उडत ) असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर गडचिरोली विभागातील एस.टी. बसेस ची दयनीय अवस्था समोर आली आहे.प्रवाशांना ह्या बसेस म्हणून जीव मुठीत घेऊन कसे प्रवास करीत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.
राज्यभर एसटी बसेस च्या वाईट स्थितीचे दर्शन घडवणारा नमुनेदार व्हिडिओ होतोय भलताच वायरल गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. ही बस छत उखडलेल्या अवस्थेत रस्त्यावरून वेगाने धावत होती. लाल परीच्या अशा स्थितीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलीही विश्रांती न घेता बस पुढे दमटल्याचे व्हिडिओत स्पष्ट झाले आहे. या एसटीच्या पुढे असलेल्या वाहनातील इसमाने हा व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभर छत गळणारी, प्रत्येक सुटा भाग वाजत असणारी, ब्रेक फेल झालेली अशा अनेक एसटी बसेस चे दर्शन प्रवाशांना वेळोवेळी होत असते. मात्र दुर्गम भागातील एसटी बसेसच्या वाईट स्थितीचे दर्शन घडवणारा हा नमुनेदार व्हिडिओ मात्र भलताच वायरल होत आहे. या बसमधील प्रवाशांचे काय झाले असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या एसटी बसचा मागोवा घेत कर्मचाऱ्यांना प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे, हे सांगण्याची गरज व्यक्त होत आहे.