राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्याने मुंबईत गणपती दर्शनाचा सपाटा लावला असून या ते दररोज इतर नेत्यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचत आहेत. यामध्ये काही कार्यकर्ते तसेच जवळचे काही पत्रकार मित्र यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले आहे, निमित्य मात्र दर्शनाचे, तर काही शिवसेनेच्या दिग्गजांच्या एकनाथ शिंदे पोहचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर आदी नेत्यांच्या घरी त्यांनी गणपतीचे आशीर्वाद घेतले. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे या शिवसेनेच्या माजी नेत्यांच्या घरीही शिंदे यांनी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले होते तेव्हा शिवसेनेकडून त्यांची समजूत काढायला मिलिंद नार्वेकर यांनी सुरत स्वारी केली होती मात्र त्यातून काहीच तोडगा निघाला नव्हता.
त्यानंतर अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेच्या बाजूला आले, यावेळी उद्धव ठाकरे हे वेळ देत नाही, त्यांच्या जवळचे बडवे आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशी भेटू देत नाही, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे. अशी अनेक एकनाथ गटात सहभागी झालेल्या आमदारांची ओरड होती. त्यात प्रामुख्याने मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत याचं नावही पुढे आल होत. मात्र जेव्हा एकनाथ शिंदे स्वतः उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात तेव्हा शिंदे गटातील ज्यांनी आरोप केला होता आता त्यांची काय अवस्था झाली असेल?…नार्वेकर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याचे दिसून आले.
शिवसेनेवर आगपाखड करणारे नारायण राणेंच्या घरी सुद्धा मुख्यमंत्री गेल्याने विविध चर्चेला उधान आले, राणेंच्या घरी भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आज येथे दर्शनासाठी आलो आहे. भेटीदरम्यान अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी (नारायण राणे) मुख्यमंत्री असतानाचे अनुभव मला सांगितले. जनता की सरकार है. काय चांगले होऊ शकते. सर्वसामान्यांसाठी केले जावे यावर चर्चा करण्यात आली.बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.प्रत्येकवेळी राजकीय बोलणे आवश्यक आहे का?आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही.तो शिष्टाचार होता.मी गणपती दर्शनासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. बाळासाहेबांसोबत आम्ही यापूर्वी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.
शिंदे यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट घेतली. गणपतीच्या मुहूर्तावर शिंदे यांनी राज यांची भेट घेतल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बीएमसी निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी ही बैठक झाल्यामुळे चर्चेलाही उधाण आले होते.
आठवड्याच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीही गणपती दर्शनासाठी भेट दिली होती. शिंदे हे पक्षश्रेष्ठींशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.