देशात ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सोशल मिडीयावर आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या अनेक घटना बाहेर आल्या आहेत. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातून समोर आला आहे जिथे एका महिलेला सायबर क्राइमला बळी पडावे लागले. महिलेला व्हॉट्सॲपवर असा मेसेज आला, क्लिक करताच महिलेचे 21 लाख उडून गेले.
ही घटना आंध्र प्रदेशातील एका निवृत्त शिक्षकासोबत घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अन्नमय जिल्ह्यातील मदनपल्ले येथे राहणाऱ्या या महिलेचे नाव वरलक्ष्मी आहे. महिलेला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज आला. महिलेने काहीही विचार न करता मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर अनेक वेळा क्लिक केले. त्यानंतर असे काही घडले ज्याची त्या महिलेला कल्पना नव्हती.
मेसेज आल्यावर आणि महिलेने क्लिक केल्यानंतर काही वेळातच महिलेला तिच्या खात्यातून काही पैसे कापण्यात आल्याचा मेसेज आला. महिलेला काही समजेपर्यंत हळूहळू महिलेच्या खात्यातून अनेक वेळा पैसे कापले गेले आणि मेसेज येऊ लागले. आश्चर्य म्हणजे महिलेच्या खात्यातून २१ लाख रुपये कापण्यात आले. ही महिला तातडीने पोलिसांकडे गेली.
रिपोर्ट्सनुसार, महिलेने सांगितले की तिने मेसेजमधील एका लिंकवर क्लिक केले होते, त्यानंतर तिच्या खात्यातून 21 लाख रुपये गायब झाले. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी लिंकद्वारे प्रथम महिलेचा फोन हॅक केला आणि नंतर बँक खात्यातून तिच्या मोबाइलचा वापर करून अनेक व्यवहार केले. याप्रकरणी महिला बँकेतही गेल्या, सध्या तपास सुरू आहे.