Saturday, November 23, 2024
HomeMarathi News Todayखत खरेदी करत असताना शेतकऱ्याची जात कोणती?...अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार संतापले...

खत खरेदी करत असताना शेतकऱ्याची जात कोणती?…अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार संतापले…

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करत असताना त्याची जात कोणती हे आधी सांगावं लागतं. तशी नोंद ई-पॉस मशिनमध्ये केली जाते. हे संतापजनक आहे. शेतकऱ्यांना जात नसते. तुमच्या-माझ्या पोटाला जात नसते. खत खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय?…अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलून दाखविली

शेतकऱ्यांना जातीचं लेबल चिकटवण्याच्या सरकारच्या या प्रयत्नांबद्दल शेतकऱ्यांप्रमाणेच सभागृहातल्या विरोधी सदस्यांच्याही भावना तीव्र आहेत. जात नोंदवण्याचा पर्याय आजच्या आज काढून टाकावा. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं हा उपद्व्याप केला आहे, त्याच्यावर कारवाई करावी.

ई-पॉसमध्ये जातीचा रकाना नव्यानं टाकण्यात आला आहे. जातीचा रकाना भरल्याशिवाय खतखरेदीची प्रक्रिया पुढे जात नाही. शेतकऱ्यांना खतखरेदीसाठी दुकानात गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याबरोबर जातही सांगावी लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: