Saturday, September 21, 2024
HomeMobileभारतीय लोक फोनवर सर्वात जास्त काय करतात?...अहवालातून हे आले समोर...

भारतीय लोक फोनवर सर्वात जास्त काय करतात?…अहवालातून हे आले समोर…

न्युज डेस्क – स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. फोनवर सर्च करण्यापासून ते ऑनलाइन पेमेंट करण्यापर्यंत अनेक कामे केली जातात. मात्र, स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कोणत्या कामासाठी होतो? विवोने याबाबत एक रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

जर आपण स्मार्टफोनवरील वापरकर्त्याच्या एक्टिविटी बद्दल बोललो, तर स्मार्टफोनचा वापर बहुतेक युटिलिटी बिले भरण्यासाठी केला जातो. अहवालानुसार, सुमारे 86 टक्के लोक फोनद्वारे युटिलिटी (विविध सेवांची बिले) बिल भरतात.

तर 80.8 टक्के ऑनलाइन शॉपिंगसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. हेच 61.8 टक्के लोक जीवनावश्यक वस्तू ऑर्डर करण्यासाठी स्मार्टफोन वापरतात. तर ६६.२ टक्के लोक ऑनलाइन सेवेसाठी स्मार्टफोन वापरतात.

याशिवाय ७३.२ टक्के लोक किराणा सामान ऑर्डर करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. 58.3 टक्के लोक डिजिटल कॅश पेमेंटसाठी स्मार्टफोन वापरतात.

जर आपण स्मार्टफोनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर सुमारे 62 टक्के पुरुषांकडे स्मार्टफोन आहेत. तर महिला स्मार्टफोन वापरात मागे आहेत. देशातील केवळ 38 टक्के महिलांकडे स्मार्टफोन आहेत.

जर आपण मोठी शहरे आणि लहान शहरांबद्दल बोललो तर, मेट्रो शहरे स्मार्टफोन शेअरमध्ये 58 टक्के पुढे आहेत. यानंतर 41 टक्के नॉन मेट्रो शहरांचा क्रमांक लागतो.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: