Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayआई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी वेडे व्हा - पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश...

आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी वेडे व्हा – पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव

वेडी माणसेच इतिहास निर्माण करतात – पोलीस उपअधिक्षक नागेश जाधव

जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोल येथे मार्गदर्शन

अतुल दंढारे
नरखेड प्रतिनिधी/२६ फेब्रुवारी

आई-वडिलांच्या संस्कारामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रामाणिक अधिकारी म्हणून ३५ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली.विद्यार्थ्यांनो,आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी वेडे व्हा.वेडी माणसेच ‘इतिहास’ निर्माण करतात.भान ठेवून ‘ध्येय’ ठरवा व बेभान होऊन मेहनत करा तेव्हा यश तुमच्या पदरात असेल असा हितोपदेश काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांनी ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमादरम्यान दिला.
जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे बालवक्ता कु.नंदिनी विवेक बोरकर (वर्ग२रा) व विक्रांत हेमंत टाकरस(वर्ग ७ वा) यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ व पार्थ मारोती हिवसे (वर्ग ७) याने ‘संत गाडगेबाबा’ या विषयावर अमोघ वक्तृत्व शैलीत मार्गदर्शन केले.
यावेळी, प्रजासत्ताक दिन निमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यात नृत्य स्पर्धेत अरुणा नेहारे, जास्मिन अंसारी,नोमादेवी खुरपडे,मिनल आसटकर,श्वेता धंडाळे गीतगायन स्पर्धेत यशश्री गजभिये, स्वर्णा कोटजावळे, काव्यवाचन स्पर्धेत प्रतिक मानेराव,शुभम शेंडे यांनी बक्षिसे पटकावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, संचालन वैष्णवी ठाकरे तर आभार प्रदर्शन स्वर्णा कोटजावळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे,संगणक परिचालक सतिश बागडे,परिचारिका अनुसया रेवतकर, विद्यार्थी पवन मुरूस्कर, विपुल खुबाळकर,अभय धुर्वे, शुभम शेंडे,प्रतिक मानेराव,जास्मिन अंसारी आदींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: