मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक उध्दव ठाकरे यांच्या गटासाठी अत्यंत महत्त्वाची लढत मानली जात होती, पण आता ती केवळ औपचारिकता राहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेसोबत युती करत असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपला उमेदवार मागे घेतला. आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय आता निश्चित झाला. मात्र यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते, तर यावेळी अनेक अमराठी BJP कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना खुले आव्हानही दिले.
रविवारी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋतुजा लटके विरोधातील भाजप उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाने ही जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली होती. सोमवारी अनेक बैठका झाल्यानंतर अखेर भाजपने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे आणि भाजप-शिंदे गटातील पहिलीच मोठी लढत आमने-सामने होणार होती. या निवडणुकीत शिंदे गटाकडून कोणताही उमेदवार दिला जरी नसला तरी मात्र तरीही उध्दव ठाकरे vs शिंदे असेही चित्र या निवडणुकीत बघायला मिळाले असतं. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर फ्रीज केल्याने दोन्ही गटांना दोन वेगवेगळी नावे व चिन्हे दिल्याने साहजिकच सहानुभूती म्हणून अंधेरीतील जनतेचा कौल हा उध्दव ठाकरे यांच्याबाजूने असल्याचे चित्र सध्या आहे.
ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी मुंबईतील खरी ताकद तपासण्याची संधी होती. ऋतुजा लटके यांचा विजय म्हणजे नेते, आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी जनता आणि मतदार ठामपणे ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. हे या निवडणुकीत दिसून आले असते.
आगामी बीएमसी निवडणुकीचा अंदाज या निवडणुकीत समोर आला असता भाजप-शिंदे युतीशी थेट टक्कर म्हणजे उद्धव यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांचे नवीन निवडणूक चिन्ह (जलता मशाल) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नाव लोकप्रिय करण्याची संधी होती.
गेल्या निवडणुकीत अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या मनसेला चांगली मते मिळाली होती. मनसेने येथील मराठी मतदारांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. भाजपने बिगर मराठी उमेदवार उभा केला म्हणजे मनसेची मते एकतर शिवसेनेकडे (शिवसेना यूबीटी) जातील किंवा भाजपपासून दूर राहतील. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकले असते, पण आता अशी परिस्थिती उद्भवणार नाही.
भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युती आणि शिवसेना (UBT) यांच्यात थेट लढत झाली असती आणि ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांच्या गटाने जिंकली असती तर मुंबईत त्याचा मोठा परिणाम झाला असता. बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव यांच्यासोबत राहायचे की शिंदे गटात सामील व्हायचे याचा निर्णय बीएमसीच्या अनेक माजी नगरसेवकांनी घेतलेला नाही.
गुजराती आणि मराठी उमेदवार यांच्यात सरळ लढत झाल्याने ‘मराठी माणूस की पार्टी’ या उक्तीमुळे या निवडणुकीत उद्धव गटाला बळ मिळाले असते. बीएमसी निवडणुकीपूर्वी मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊ शकले असते, जे आता दिसत नाही.