Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayरोहित शर्माने DRS घेताना या फलंदाजाला काय म्हणाला?...हा व्हिडिओ होतोय व्हायरल...

रोहित शर्माने DRS घेताना या फलंदाजाला काय म्हणाला?…हा व्हिडिओ होतोय व्हायरल…

न्युज डेस्क : रोहित शर्मा २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत केवळ शानदार फलंदाजी करत नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही चांगली कामगिरी करत आहे. स्पर्धेतील 37व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी मोठा विजय नोंदवला. टीम इंडियाने प्रथम खेळताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या. विराट कोहलीने संघर्षपूर्ण शतक झळकावले. त्याने 121 चेंडूत 101 नाबाद धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.१ षटकांत ८३ धावा करून सर्वबाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने 5 बळी घेतले. दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित डीआरएस घेताना साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाला उद्देशून म्हणताना दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 13व्या षटकाचा आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा हे षटक टाकत होता. 5व्या चेंडूवर, त्याने हेनरिक क्लासेनविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी त्याला आऊट दिले नाही. यानंतर जडेजा, कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल बोलताना दिसत आहेत. यादरम्यान रोहित म्हणतो की तो एकमेव फलंदाज शिल्लक आहे. त्यानंतर विचीत्र बोलत त्याने डीआरएस घेण्याचे संकेत दिले. चेंडू विकेटला आदळत होता आणि क्लासेनला थर्ड अंपायरने आऊट दिल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले होते. त्याने 11 चेंडूत एक धाव घेतली. क्लासेन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. चालू विश्वचषकातही त्याने शतक झळकावले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: