न्युज डेस्क : नुकत्याच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी प्रतिक्रिया देत असताना ते अस काय बोलून गेले की, यावर भाजपने खिल्ली उडवत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीनंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. या वेळी ते म्हणाले, मध्य प्रदेशातून सरकार जात आहे, राजस्थानमध्ये सरकार जात आहे, छत्तीसगडमध्येही सरकार जात आहे.
यानंतर लगेचच त्याला त्याची चूक लक्षात आली आणि मग ते म्हणाले, ‘मी चुकीचे बोललो… तुम्ही (पत्रकार) मला गोंधळात टाकले.’ पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस चमकदार कामगिरी करेल, अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. पक्षशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
त्यांच्या जीभ घसरल्याचा व्हिडिओ शेअर करत भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स (पूर्वीचे ट्विटर)’वर पोस्ट केले, “राहुल गांधींनी मान्य केले आहे, राजस्थान आणि छत्तीसगडमधून काँग्रेसचे सरकार जाणार आहे!” अनेक भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करून, त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
राहुल गांधी ने स्वीकार कर लिया, राजस्थान और छत्तीसगढ़ से जा रही है कांग्रेस सरकार! pic.twitter.com/85ORupRavs
— BJP (@BJP4India) October 9, 2023