नांदेड – महेंद्र गायकवाड
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धा अटीतटीच्या झाल्या. बाद फेरीतून साखळीत दाखल झालेल्या संघात रोमहर्षक सामने झाले. त्यात एल.एन.आय.पी.ई. ग्वाल्हेर विद्यापीठाने साखळीत सलग तिन सामने जिंकत विजेतेपद पटकावले. भारती विद्यापीठ, पुणे संघाने उपविजेतेपद पटकावले तर तृतीय स्थानी एस.के.डी.यु. विद्यापीठ, हनुमानगढ आणि चौथ्या स्थानावर आर. टी. एम. यु. विद्यापीठ नागपूर संघ राहिला.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धा दि.१४ ते १८ डिसेंबर या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड येथे पार पडल्या. विविध मैदानावर दिवस-रात्र झालेल्या बाद व साखळी पद्धतीच्या सामन्यात खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. याला क्रीडा प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला.
साखळी सामन्यात ग्वाल्हेर विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाचा ३-०, पुणे संघाचा ३-१ व हनुमानगढ विद्यापीठाचा अटीतटीच्या लढतीत ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुणे संघाने हनुमानगढ व नागपूर संघाचा पराभव करून उपविजेतेपद पटकावले. तर हनुमानगढ विद्यापीठाने नागपूरचा ३-० असा पराभव करून तिसऱ्या क्रमांकावर त्याला समाधान मानावे लागले. नागपूर विद्यापीठाच्या संघाला साखळीत एकही विजय नोंदवता न आल्याने चौथ्या स्थानावर राहावे लागले.
या स्पर्धा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, परीक्षा व मुल्यामापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. सुर्यकांत जोगदंड, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, प्रो. डॉ. प्रदिप देशमुख, अंकुश पाटील, पी.एस. पंत, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत अंधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंकुश पाटील, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड, प्राचार्य डॉ. दिपक बच्चेवार,
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. गंगाधर तोगरे, महेश पाळणे, डॉ. दिलीप माने, डॉ. बी.पी.हालसे, डॉ. सुभाष देठे, डॉ. महेश वाखरडकर, डॉ. विनोद गणाचार्य, डॉ. अनिरुद्ध बिराजदार, डॉ. भास्कर रेड्डी, डॉ. विक्रम कुंटुरवार, डॉ. विजय उपलंचवार, प्रा.डॉ. खुशाल वाघमारे, राज्य पंच समितीचे सदस्य, विद्यापीठ कर्मचारी आदीनी परिश्रम घेतले.
विजेत्या संघाचा गौरव
स्पर्धेतील विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त राजकुमार दहीहांडे, राजकुमार दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, स्पर्धा निरीक्षक राजेश डाका, प्रा.डॉ. शिवराम लुटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.