Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayसुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड...

सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड…

मुंबई – सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांची राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते निवड करण्यात आली आहे,

गेली तीस वर्ष श्री गोरे यांनी साहित्य संवर्धनाचे अतुलनीय कार्या व्दारे आजवर १७६ हून अधिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे इतकी साहित्य संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून २ हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत, फर्डे वक्ते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत, त्यांनी ५ मराठी चित्रपट लेखक दिग्दर्शक,संगीतकार व अभिनेता म्हणून केले आहेत, त्यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या चित्रपटास फ्रान्स देशातील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जर्मनीतील बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आपली जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे.

विविध विषयांवर आजवर हजारो व्याख्याने त्यांनी दिली आहेत आपल्या अनोख्या भाषणशैलीसाठी ते विशेष परिचित आहेत,आजवर १० ग्रंथाचे विपुल लेखन केले आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत लिहिलेला बुधभूषण ह्या ऐतिहासिक ग्रंथाचा गोरे यांनी मराठीत काव्य अनुवाद केला आहे तो रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवत आहे, ते प्रकाशक व संपादक असलेल्या युंगधर प्रकाशन या संस्थेने १५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: