मूर्तिजापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर पुरुषोत्तम दिनकरराव चावके यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले, ते ३२ वर्षाचे होते, अत्यंत मनमिळाऊ, शांत व स्मितभषी असल्या चावके यांनी मूर्तिजापूर येथील केळकर वडीत सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले,
मुळचे सागंवामेळ येथील शेतकरी कुटुंबातील असलेले डॉ. पुरुषोत्तम चावके दोन भावंडे असून लहान भाऊ विदेशात एमबीबीएस पुर्ण करीत आहे. व्यवसायाने दोघेही पती-पत्नी डॉक्टर होते. या दुख:द घटनेने चावके कुटूंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. पुरुषोत्तम चावके यांना तापासारख्या आजाराने ग्रासले होते, त्यांच्यावर अकोला, नागपूर, अमरावती येथे उपचार करण्यात आहे, त्यांनी उपचाराला कुठलाही प्रतीसाद न देता ९ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान अमरावती येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान या जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील भावंडे असा आप्त परिवार आहे. लहानस्या गाव खेड्यातून येऊन मूर्तिजापूर येथे रुग्णांची सेवा करण्यासाठी केळ्करवाडी येथे सुसज्ज हॉस्पिटल उभारले, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.