Monday, November 18, 2024
Homeराज्यसुशिक्षीत बेरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न...

सुशिक्षीत बेरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न…

खामगांव – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशलफोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबरावजी पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.३ सप्टेबर रोजी खामगांव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम बुलडाणा जिल्हा (उत्तर) तर्फे मातंग समाजाच्या सुशिक्षीत बरोजगारा करिता आयोजित करण्यात आलेले सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

सदर शिबिराचे उदघाटन बिल्डर्स अँड सप्लायर्स गजेंद्रजी बोरकर, यांनी केले तर शिबिराच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे जेष्ट नेते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी संतारामजी तायडे, होते आणि माजी गटशिक्षणाधिकारी बि. के. खरात, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष तथा सत्कारमुर्ती साहेबरावजी पाटोळे,

लोणार न.प. चे उपाध्यक्ष बादशाहखानभाई, ल. सा.क. म. चे विदर्भ समन्वयक शा.ना. मानकर, माणिकराव बाजडसर,लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समदभाई, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, शंकरराव मानवतकर, काबळेसर, गजानन साठे,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर, यांनी प्रस्ताविका मधून कार्यक्रमाचा उध्देश व हेतू युवकांसमोर मांडला त्या नंतर माणिकराव बाजडसर, बादशाहखाभाई, शा.ना. मानकर बि. के. खरातसर यांची भाषणे झालीत त्या नंतर गजेंद्रजी बोरकर यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की मातंग समाजाच्या युवकांनी व्यवसायकडे वळून आपली आर्थिक प्रगती करावी आज या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे अवघड झाले आहे त्यामुळे लहान मोठ व्यवसाय करून स्ववलंबी बना असे युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले शंकरराव मानवतकर यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना मार्गदर्शन करतांना युवकांना विविध व्यवसाया बाबत तसेच शासना कडून सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसया करिता मिळणारे अर्थ सहाय्य या बाबत माहिती दिली अध्यक्षीय भाषण करतांना संतारामजी तायडे यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना आहेत परंतू त्या आपल्या पर्यंत पोहचत नाहीत त्यामुळे आता आपले नेते मा. विजयजी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमने पुढाकार घेऊन मातंग समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगाराना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प केला आहे असे सांगितले कार्यक्रमाच्या प्रसंगी साहेबरावजी पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन इंजिनियर कु.पल्लवी इंगळे आणि आभारप्रदर्शन जिल्हा सरचिटणीस विजय सकळकर यांनी केले.

कार्यक्रमाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हाकार्याध्यक्ष गजानन सोनोने जिल्हाउपाध्यक्ष भास्करराव आगाम सिताराम इंगळे शंकरराव वाघ देविदास फुटवाईक रामभाऊ वाकोडे रमेश पारधे खामगांव तालुकाध्यक्ष उमेश बाभूळकर शेगाव तालुका अध्यक्ष श्रीराम गायकवाड संग्रामपूर तालुका अध्यक्ष संदीप डाखोडे जळगांव जामोद तालुकाध्यक्ष संतोष तिरेराव नांदूरा तालुका अध्यक्ष मधुकर मानकर कैलास सोनोने सुधाकर वानखेडे नामदेव बाभूळकर सुरेश तांबे रामेश्र्वर सोनोने गणेश चांदणे कृष्णा बोदडे सागर सकळकले हरिष नाटेकर अविनाश वानखडे पवन खंडारे दुर्गेश नाटेकर स्वप्निल खंडारे बालाजी नाटेकर गजानन नाटेकर बाबुराव नाटेकर आदीसह खामगाव शेगाव संग्रामपूर जळगांव जामोद नांदूरा मलकापूर मोताळा यातालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार व समाजाचे बंधूभगिणी बहूसंखेने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: