वाडेगाव शेगावीचा राजा संत गजानन महाराजांची पालखी चे वाडेगावात मोठ्या भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले आहे. पंढरपूर करीता प्रस्थान झालेल्या विदर्भाची पंढरी म्हणून परिचित असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखीचे अकोला येथुन गोरेगाव भरतपूर नकाशी मार्गे वाडेगाव येथे दिनांक ३० मे रोजी संध्याकाळच्या सुमारास अश्व तसेच सातशे वारकरी दिंडी पताका सह स्वागत झाले त्यावेळी वाडेगाव सह पंचक्रोशीतील भाविकांनी श्री च्या पालखी चे भावपूर्ण वातावरणात स्वागत केले.
तसेच गावातून पालखी मार्गक्रमण करीत असताना मार्ग आकर्षक रांगोळ्या काढून पालखी वर पुष्पवृष्टी करण्यात येवून रजत मुखवट्या चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती तसेच गावातून पालखी सोहळ्यामध्ये स्थानिक भजनी मंडळे सहभागी होवून टाळ मृदुंगाच्या गजरात श्री च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वारकरी मंडळींना उपयोगी साहित्य तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले रात्रीचा मुक्काम जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात असुन पालखी मध्ये सहभागी वारकरी यांच्या निवास तसेच भोजनाची व्यवस्था सालाबादप्रमाणे कंडारकर कुटुंबीया कडून करण्यात येत असते.
त्यावेळी ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे तर श्री च्या पालखी ची वाडेगाव मार्गे ५४ वी वारी असल्याची माहिती आहे तर श्री च्या पालखीचा मुक्काम असलेल्या परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते भाविकांना श्री चे दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण होवू नये तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी बाळापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. (पालखी सोहळ्यामध्ये वाहतूकीचा व्यत्यय). रोड वरुन पालखी सोहळा मार्गक्रमण करीत असताना रोड वरुन होत असलेली जड वाहतूकीमुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता तर काही नागरिकांनी वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे सदर प्रकार लक्षात आणून देवुन पालखी मुक्कामस्थळी पोहचे पर्यंत जड वाहतूक थांबविण्याची मागणी करण्यात आली.