Monday, December 23, 2024
Homeविविधशाल्मली खोलगडेसह नववर्षाचे स्वागत, संगीत, नृत्यासह नवीन वर्षाचे संस्मरणीय आगमन...

शाल्मली खोलगडेसह नववर्षाचे स्वागत, संगीत, नृत्यासह नवीन वर्षाचे संस्मरणीय आगमन…

नववर्षाच्या स्वागतासाठी आता काहीच दिवस उरलेले असताना संपूर्ण देश हा क्षण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान नववर्ष संगीत, नृत्यासह धमाल मनोरंजनाने साजरे करण्यासाठी मुंबईतील साया ग्रँड क्लब अँड स्पा रिसॉर्ट देखील सज्ज झाले असून शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवण्याच्या वचनासह बॉलीवूडचा आयकॉनिक आवाज शाल्मली खोलगडे टॉप-हिट गाणी सादर करत तुम्हाला रात्रभर खिळवून ठेवेल. हिरवाईने बहरलेल्या १६ एकर परिसरात या विशेष संध्येचे आयोजन करण्यात आले असून ही नवीन वर्ष पूर्व संध्या चुकवू नये अशीच ठरणार आहे. या कार्यक्रमाची तिकीट बुक माय शो आणि इन्सायडरवर उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: