सांगली – ज्योती मोरे
वेफा मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून अधिक लाभाचे आमिष दाखवून कोट्यावधींची गुंतवणूक करायला लावून, सुरुवातीला काही दिवस परतावा देऊन नंतर तो परतावा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या, वेफाचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर राहणार गोंधळेवाडी तालुका जत यास आज आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्यास न्यायालयात हजर केला असता त्यास दिनांक 27 सप्टेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आजपर्यंतच्या तपासात बारा गुंतवणूकदारांची एक कोटी ८६ हजारांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाले. सांगली जिल्ह्यातील नागरिकांची बोगस कंपन्याद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरिता पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस हवालदार इरफान पखाली उदय घाडगे अमोल लोहार विनोद कदम कुलदीप कांबळे दीपक रणखांबे रूपाली पाटील यांनी कारवाई केली आहे.