Weather Update : देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचे IMD सांगितले आहे. सध्या अनेक राज्यात उष्णतेचा प्रभाव दिसून येत आहे. त्याचवेळी अनेक राज्यांमध्ये हलक्या रिमझिम तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, सध्या उत्तर भारतातील अनेक भागात दक्षिण-पश्चिम मान्सूनचे पुनरागमन दिसून येत आहे.
त्यामुळे 3 आणि 4 ऑक्टोबरपर्यंत सतत मुसळधार पाऊस पडणार आहे. यूपी, बिहार व्यतिरिक्त राजस्थान आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. देशातील इतर भागात पाऊस पडू शकतो, यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. तर विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. गोवा, केरळ, ओडिशा, कर्नाटक आणि छत्तीसगड व्यतिरिक्त तेलंगणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने म्हटले आहे की ओडिशात पाऊस पडण्याचे कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती आहे. सध्या अशीच परिस्थिती उत्तर-पूर्व आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरात दिसून येत आहे. त्यानंतर ४८ तासांत ते ओडिशा आणि कोस्टल बंगालच्या भागाकडे सरकू लागेल.
पूर्व भारतातही मुसळधार पावसाचा इशारा
बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त गया आणि अराहमध्येही पावसाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही विभागाने व्यक्त केली आहे. पाटणासह अनेक भागात वेदर अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिहारमध्ये हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे म्हटले आहे. ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून सरासरी ७.६ किलोमीटरवर आहे.
Past 24 hrs (01.10.2023 upto 08:30 hrs IST) Realised Rainfall of Vidarbha Region#WeatherReport #imdnagpur #IMD@ChandrapurZilla @collectorchanda @KrishiCicr @InfoWashim @Indiametdept @ngpnmc @LokmatTimes_ngp @collectbhandara @CollectorNagpur @CollectorYavatm pic.twitter.com/vxQSbvTYZU
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) October 1, 2023
पूर्व भारतातही पावसाचा इशारा विभागाने जारी केला आहे. सर्व हिमालयीन भागांव्यतिरिक्त सिक्कीम आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही अशी शक्यता आहे. याशिवाय ओडिशा आणि अंदमान निकोबार बेटांवर ३ ऑक्टोबरला पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे.