सांगली – ज्योती मोरे.
आज भाजपा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आम.सुधीर दादा गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष दिपक बाबा शिंदे म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील विदर्भात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेतील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल सावरकर हे इंग्रजाचे गुलाम होते, ब्रिटिशांचे हस्तक होते,त्यांनी इंग्रजांच्याकडे नोकरीची मागणी केली होती.
अशा प्रकारचे अत्यंत चुकीचे अपमानास्पद उद्गार काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांचाच अपमान नव्हे तर, संपूर्ण भारतीयांचा, महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान केला आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला, कारावासात प्रचंड यातना भोगल्या,ज्यांनी देशासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं, त्यांच्या बाबत इतक्या खालच्या पातळीवर राहुल गांधींनी केलेले आरोप महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही,त्यांनी यापूर्वीही सावरकरांच्या बद्दल असेच उद्गार काढले होते.
या बाबत त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. अन्यथा भाजप कार्यकर्ते त्यांना वाटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनाच्या वेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य शेखर इनामदार, महाराष्ट्र प्रदेश सदस्य निताताई केळकर, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिर्जे, मोहन वनखंडे, माजी महापौर संगीताताई खोत, गीताताई सुतार, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, संघटनमंत्री दीपक माने, सरचिटणीस अविनाश मोहिते, नगरसेवक सुबरावतात्या मद्रासी,
पांडुरंग कोरे, युवराज बावडेकर, संजय यमगर, विनायक सिंहासने, रणजीत सावर्डेकर, भारतीताई दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, कल्पना कोळेकर, संगीता मदने, उर्मिला बेलवलकर, सागरे, सोनाली, संजय कुलकर्णी, अनारकली कुरणे, मुन्नाभाई कुरणे, सागर व्हणखंडे, डॉ.भालचंद्र साठे, बाळासाहेब पाटील, जयवंत पाटील, केदार खाडीलकर, अश्रफ वांकर, विश्वजीत पाटील, शहानवाज सौदागर,
कयूम शेख, गणपती साळुंखे, सतीश खंडागळे, किरण भोसले, प्रियानंद कांबळे, अर्जुन मजले, ज्योती कांबळे, उदय मुळे, रवींद्र वादवणे, सुजीत राऊत, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, राजू जाधव, हेमलता मोरे, विकास आवळे, विनायक शिंदे, गौस पठाण, धनाजी पाटील, रोहित चिवटे, अजिंक्य हंबर, इम्रान शेख, निलेश निकम आदी पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.