रामटेक – राजु कापसे
आकाश जे फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान, मनाम एकता मंच दुकानदार संघ आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन व आकाशझेप फाउंडेशनच्या ९व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्टला रामटेक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४१ व्यक्तींनी रक्तदान करून स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या देशभक्तांना मानवंदना देत राष्ट्रीय एकात्मतेचा कृतीशील संदेश दिला. यावेळी आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार, संचालक वैभवराव तुरक यांनी ‘रक्तदान महादान’ या विषयावर मार्गदर्शन केले.
शिबीरात राकेश हिवसे, रेहान शेख, प्रमोद, प्रदीप कडबे, जितेंद्र मेश्राम, भोजराज महेशकर, भीमसेन खोब्रागडे, अनिरुद्ध काकडे, कालीन शेख, आशिष फुलबांधे, अंकुश महाजन, सुमित भोगे, राहुल भागडकर, राधेश्याम गुरव, राहुल शेंडे, ऋशिकांत मिश्रा, सचिन वलोकर, राकेश चौरसिया, विजय फुलबांधे, वैभव तुरक, सुनील जांगडे, पप्पू मोटघरे, योगेश बिसन, सतीश सुरूसे, दिलीपकुमार ढोमणे, पुरुषोत्तम हटवार, नवीन कुचनकर, राहुल तुरक यांचेसह ४१ व्यक्तींनी रक्तदान केले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.आकाश देवसरकार, संदीप महाकाळकर, प्रफुल्ल सोनटक्के, रुपाली कावळे, नीकीता श्रावनकर, संदीप आकरे, कार्तिक बंड, सतीश राठोड यांनी रक्त संकलन केले. याप्रसंगी आकाशझेप सदस्य शुभा फुलकर, दीपा चव्हाण, प्रा. उन्मेष पोकळे, राजेश किंमतकर, पत्रकार अनिल वाघमारे, जगदीश सांगोडे, नंदकिशोर पापडकर, डॉ. योगेश राहाटे प्रामुख्याने उपस्थित होते. महादेव सरभाऊ, सुमेध गजभिये, जितेंद्र कोचे, खुशाल चकोले, एकता मंचचे सुनील खुरगे, उमेश पापडकर, भूषण सवाईकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.