गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया दि.१५/११/०२३ ला जिल्हा परिषद सुकळी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा बालापुर येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रमाला या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.;त्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत भगवान बिरसा मुंडा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला आणी सर्वांना या महामानवाच्या जिवनातुन बोध घेण्यास सांगितले.
तसेच दिवाळी व मंढई निमित्त खड़की, डोंगरगाँव, बरबसपुरा, गुमाधावडा़, मरारटोला, वडेगाँव इथं आयोजित कार्यक्रमांना अध्यक्ष रुपात उपस्थित राहत सर्वांना मार्गदर्शन करतांनी संबोधित करतांना म्हणाले कि जर तुम्हाला कोणतीही गरज भासल्यास मला आपला मुलगा, लहान भाऊ समजुन हाक द्या मि तुमच्या सेवेसाठी साठी २४ तास तैयार आहे.
आपल्या क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे करत आहोत आणि पुढेही करत राहनार तुमचं असंच प्रेम आणी आशिर्वाद राहिल असे मी अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांना दिवाळी मंढई व येणाऱ्या नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.