Saturday, November 16, 2024
Homeसामाजिककृषीभूषण दादाराव देशमुख निवर्तले...अकोला जिल्ह्याचा पाणीदार माणूस हरवला सोमवारी मृत्यूपरांत देहदान केले...

कृषीभूषण दादाराव देशमुख निवर्तले…अकोला जिल्ह्याचा पाणीदार माणूस हरवला सोमवारी मृत्यूपरांत देहदान केले जाणार…

पातूर – निशांत गवई

जलतज्ञ, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते दादाराव देशमुख यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७४ व्या वर्षी अकोला येथील खाजगी इस्पितळात आज दि ९ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी 2 वाजता निधन झाले.अंतिम दर्शनासाठी पातुर तालुक्यातील चरणगाव येथे सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पार्थिव ठेवण्यात येईल.मरणोत्तर त्यांचे देहदान जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी १२ वाजता करण्यात येणार आहे.

पातुर तालुक्यातील चरणगाव येथील दादाराव देशमुख यांनी तहयात शेतकऱ्यांना विषमुक्त शेती उत्पादन, शेतमालासाठी श्रमिक भारती शेतकऱ्यांची अकोला जिल्ह्यातील पहिली उत्पादन कंपनी, त्याबरोबरच पातुर तालुक्यातील नव्हे तर अकोला जिल्ह्यातील धरणांचे कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे यासाठी जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांचा महासंघ स्थापन केला.

त्यामध्ये प्रत्येक जलप्रकल्पातील पाणी वापर संस्थांना एक संघ केलं. निर्गुणा पाणी वापर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थापन केली होती.शासनाचे यासंबंधीची सर्व अधिकार शेतकऱ्यांना मिळवून दिले होते त्याबरोबरच पातुर नागरी पतसंस्था शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. सातत्याने आयुष्यभर शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलण्यासाठी शासनाचे उंबरठा झिजवले.

अनेक कृषिमंत्र्यांना शासनातील संबंधित खात्याच्या सचिवांना पातुर तालुका अकोला जिल्हा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागाचे शेतकऱ्याच्या बांधावरील दौरे करण्यास भाग पाडले. लिंबू उत्पन्नावर उत्पादनाबाबत आंध्र प्रदेश राज्य सरकारला मार्गदर्शनही केले त्याबरोबरच राज्यातील अनेक मंत्री त्यांचं मार्गदर्शन घेत होते मात्र त्यांनी कोणतेही राजकीय पद न घेता आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहिले आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही ते शेतकऱ्यांसाठी धडपडत होते.

रविवारी अकोल्यातील एका खाजगी दवाखान्यात त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी शीतपेटीमध्ये त्यांच्या पातुर तालुक्यातील मूळ गावी चरणगाव येथे नेण्यात आले. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तालुक्यातील नागरिकांसाठी चरणगाव येथे अंतिम दर्शन घेता येईल.त्यांनंतर १२ वाजता अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचे मरणोत्तर देहदान केले जाणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव राजुभाऊ देशमुख आणि स्नूषा एड. भारती देशमुख यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: