Sunday, December 22, 2024
Homeराज्ययेत्या २ महिन्यात टेंभू विस्तारित योजनेची सुधारित प्रशासकिय मागण्या (सुप्रमा) घेवुन गावांना...

येत्या २ महिन्यात टेंभू विस्तारित योजनेची सुधारित प्रशासकिय मागण्या (सुप्रमा) घेवुन गावांना पाणी याम्हीच देणार – खा. संजयकाका पाटील यांची ग्वाही…

सांगली – ज्योती मोरे

जि.प. सदस्याने उपमुख्यमंत्री पदापर्यंत ज्या सावळज परीसराच्या जीवावर मजल मारली त्या गावांना तुमच्या ४५ वर्षे कार्यकिर्दीत हक्काचे पाणी देता आले नाही. आम्ही वायफळे ता. तासगाव येथे अधिकारीवर्ग व संबंधित गावच्या शेतकऱ्यासह बैठक घेवुन सदर वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजने मध्ये समावेश करून सुप्रमा अंतिम टप्पात आली आहे.

हे सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी व राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. हे उपोषण म्हणजे तुमच्या 45 वर्ष च्या राजकीय अपयशाची कबुली आहे. येत्या २ महिन्यात टेंभू विस्तारित योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) घेऊन वंचित गावाना पाणी आम्हीच देणार.

आ. सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी गांधी जयंती (२ ऑक्टो.) दिवशी सावळज सह ८ वंचित गावाचा समावेश टेभूमध्ये करावा यासाठी दिलेल्या उपोषणाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खा. संजयकाका पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना खा. संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुक्यातील सर्व पाणी योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले २०१३ साली पडलेल्या जीवघेण्या दुष्काळामध्ये त्रस्त शेतकऱ्यांनी मांजर्डे ता.तासगाव येथे दुष्काळी पाणीपरिषद आयोजित केली होती. या पाणीपरिषदेमुळे पराभव समोर दिसु लागल्याने विसापुर- पुणदी योजना करण्यात आली.

त्यावेळी तात्कालिन मंत्र्यांनी याच योजनेमधुन सावळज सह ८ वंचित गावांना पाणी देणार असल्याची फसवी घोषणा करून त्याची बॅनरबाजी व पेपरबाजी करून तासगाव तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपुन तालुका कॅलिफोर्निया होणार असल्याची बतावणी केली.

याचवेळी पुनदी उपसा सिंचन योजनेतून सिद्धेवाडी तलाव वर्षातून ३ वेळा भरणार असल्याची लबाड घोषणा केली होती प्रत्यक्षात मात्र या योजनेतून आजअखेर एकदाही सिदधेवाडी तलाव २५% पेक्षा जास्त भरू शक‌ला नाही. यानतरही सातत्याने या गावांचा टेभू योजनेमध्ये समावेश झाले असल्याचे दिवास्वप्न विदयमान आमदारांनी दाखवून सावळज परिसरातील गावांना झुलवत ठेवले महाविकास आघाडी सरकार असताना, ८ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन आमदार पुत्रांनी सावळजसह ९ गावे टेभू योजनेत समाविष्ट झालेची माहिती देवुन स्वतःची पाठ थोपटुन घेतली होती.

२०१४ साली समावेश केल्याचे तात्कालीन मंत्र्यांनी सांगितले होते तीतपासुन ते २०२२ साली पर्यंत आमदारपुत्रांनी वल्गना करेपर्यत या गावांचा समावेश झालेला होता. तर आता उपोषणाची नौटंकी कशासाठी, व दुष्काळाने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना भीती दाखविण्याचा उद्योग राजकीय स्वार्थासाठी कशासाठी असा संतप्त सवाल खा संजयकाका पाटील यांनी विचारला.

दि. १७/०९/२०२३ रोजी वायफळे येथे झालेल्या वंचित ८ गावतील शेतकरी व अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विस्तारित टेंभु योजनेच्या सुधारित प्रशासकिय मान्यता’ (सुप्रमा) सदयस्थिती वंचित गावांना पाणी देण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या वितरिका, डिझाईन, अंदाजपत्रक इ. ची सविस्तर चर्चा तसेच सदर गावे समावेश होण्यासंदर्भातील २०१६ पासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत दिली.

तालुक्यातील श्रेयवादाला सोकावलेल्या विरोधकांनी पाणी येणारच आहे हे लक्षात आल्यामुळे आपलं गेल्या 45 वर्षातील अपयशाचं पितळ उघडे पडेल या भीतीने उपोषणाची नौटंकी सुरू केली आहे. मात्र तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. गेल्या ४५ वर्षे यांच्या भुलथापांना बळी पडलेल्या लोकांना आता सत्य समजले आहे.

म्हणून अडीच वर्षे उशीर

कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना या ८ गावांना तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी, सकारात्मक प्रयत्न केले होते मात्र दुर्दैवाने राज्यात सत्तातर झाले या अडीच वर्षाच्या काळात ही योजना पुर्ण होवू नये म्हणून प्रयत्न करणारे झारीतल्या शुक्राचार्यांची नावे आम्हास जाहिर करावयास लावु नका.असा इशारा खा. संजयकाका पाटील यांनी दिला. प्रमुख उपस्थित – तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकरबाबा पाटील

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: