Sunday, December 22, 2024
Homeराज्यमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा योजना कार्यान्वीतनागेपल्ली व‌ आलापल्ली वासियांना मिळाले...

मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा योजना कार्यान्वीतनागेपल्ली व‌ आलापल्ली वासियांना मिळाले तीन महिन्यानंतर पाणी…

अहेरी – नळ योजनेच्या थकित विद्यूत बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने वीद्युत पुरवठा कपात करीत अहेरी मुख्यालगतच्या आलापल्ली, नागेपल्ली येथील पाणी पुरवठा योजना बंद पाडली. यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांची तीन महिन्यांपासून भर पावसात पाण्यासाठी होणारी होरपळ लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आंदोलनाचा इशारा देत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.

याची दखल घेत जिप सीईओ आयुषी सिंग यांनी तत्काळ प्रशासकीय हालचाली करुन दोन्ही गावातील पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वीत केल्या. यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर नागरिकांना नळाचे पाणी उपलब्ध झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वीजेचा भरणा न केल्याने महावितरणने आलापल्लीसह नागेपल्ली येथील नळ योजनेची विद्यूत सेवा कपात केली. त्यानंतरही संबंधित प्रशासनाने विजेचा भरणा न केल्याने तब्बल तीन महिने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली होती. यामुळे भर पावसाळ्यात दोन्ही गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु होती.

या गंभीर बाबीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नळ योजना कार्यान्वीत करण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला. तसेच प्रशासनाने तत्परता न दाखविल्यास या परिसरातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या गंभीर बाबीची दखल घेत गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी प्रत्यक्ष दोन्ही गावांना भेट दिली.

यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना थकीत वीज बिल भरणा करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासंदर्भात आयुषी सिंग यांनी जिल्हाधिका-यांशी यासंदर्भात चर्चा करुन नळ योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी महावितरणला सदर योजना तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले.

महावितरणने सदर योजना सुरु केली यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर नागेपल्ली व आलापल्ली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१) आलापल्ली व नागेपल्ली येथील नळयोजना गेल्या चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने येथील गोर गरीब नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती मात्र अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नळयोजना सुरळीतपणे सुरू करून नागरिकांच्या घरा पर्यंत पाणीपुरवठा झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा केले आहे व प्रशासनाने याची दखल घेऊन आलापल्ली व नागेपल्ली येथील नळयोजना सुरळीतपणे चालू केले आहे

विजया विठ्ठलानी
माजी जिल्हा परिषद सदस्या

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: