एकोडी – महेंद्र कनोजे
गोरेगाव तालुक्यातील तेलनखेडी येथील नळ योजनेला ग्रहण लागले आहे. मागील दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्याने गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची जुळवाजुळव करताना महिलांची चांगलीच पायपीट सुरू आहे. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासन आणि जि.प.पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शासनाच्या हर घर-जल से नल योजनेला ग्रहण लागले आहे.
सध्या जून महिना शेवटच्या टप्प्यात आहे. जिल्ह्यात अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे गावशिवारातील जलस्त्रोतांची पाणी पातळी तळाला गेली आहे. तर अनेक जलस्त्रोत आटले आहेत. अशातच तेलनखेडी येथील नळ योजना ठप्प पडल्याने गावामध्ये अघोषित पाणीबाणी निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊनही स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन आणि जि.प.चा पाणी पुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नाही.
जिल्हाभरात जल जीवन मिशन अतंर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा करणे होता. परंतु, शासनाच्या उद्देशाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हरताळ फासत आहेत. तेलनखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई याचे उत्तम उदाहरण आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देवून ठप्प पडलेल्या नळ योजनेला पुर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावकर्यांकडून केली जात आहे.
शेतशिवारातील बोरवेलचा आधार
तेलनखेडी गावातील नळ योजना मागील दोन महिन्यांपासून बंद पडून आहे. यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच महिलांना पिण्याच्या पाण्यासा शेतशिवारातील बोरवेलचा आधार घ्यावा लगता आहे यामुळे एक ते दोन किमीची प�