नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी सार्वजनिक जलशुध्दीकरण यंञ बसवण्यात आले लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक जलशुध्दीकरण यंञ बसवण्यात आले आता उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत. हे एक आरो एटीएम बंद असून शोभेची वस्तू बनले आहे जिल्हा परिषद डिजिटल शाळेच्या बाजुला बांधण्यात आलेल्या आरो प्लँट आहे तेही ‘आरो’ बंद पडले असून शोभेची वस्तू दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
तालुक्यातील गंजगाव येथे पाच रुपयात वीस लिटर शुद्ध फिल्टर पाणी मिळणार म्हणून ग्रामस्थांनी या योजनेचे स्वागत केले होते. परंतु लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ग्रामस्थांना भर उन्हाळात थंड आरोचे पाणी पिण्यास मिळाले नाही, असे दिसून आले जवळजवळ एक महिन्यापासुन जलशुध्दीकरण यंञ बंद आवस्थेत आहे.
गावातील ग्रामस्थांना माचनुर येथुन पाणी विकत घ्यावे लागत आहे सरपंच कनशेटे यांना वारंवार सांगुन सुध्दा या गंभीर बाबीकडे पुर्णता दुर्लक्ष केले आहे.गावासाठी शुध्द पाण्याची सोय नसल्यामुळे सरपंच कनशेटे यांच्यावर जनतेचा आक्रोश आहे लवकरच जलशुध्दीकरण यंञ चालु नाही केल्यास गावकरी सह ग्रामपंचायती वर घागर मोर्चा काढण्याचा ईशारा वैभव घाटे यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.