आईने आपले मूल गमावले या दुःखापेक्षा दु:खदायक दुसरे काहीही असू शकत नाही. ही गोष्ट फक्त माणसांनाच लागू होत नाही, तर प्राण्यांनाही तीच वेदना जाणवते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मादी हत्ती आपल्या मृत पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आसाममधील गोेश्वरमध्ये ही घटना घडली. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
कळपातून भरकटल्याने हत्तीचे बाळ ३ दिवसांपूर्वी मरण पावले होते. पण आईने आपल्या मुलाला सोडले नाही. तिने मुलाला 2 किमीपर्यंत नेले आणि नदीच्या प्रवाहात ठेवून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “याने माझे हृदय तुटले. मूल मेले पण आईने हार मानली नाही. मृत मुलाला दोन किलोमीटरपर्यंत नेले आणि पाण्यात ठेवून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. आणि आईचा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता.”
हत्ती मातेला या वेदनांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल अशी आशा आहे.
This broke my heart. The calf has died but mother doesn’t give up. Carries the dead baby for two KMs and tries to revive it by placing in water. And the mother’s cries ranting the air😭😭
— Susanta Nanda (@susantananda3) June 15, 2023
Via @NANDANPRATIM pic.twitter.com/ufgPsYsRgE