वाशीम : मानोरा तालुक्यातील साजा वडगाव येथील तलाठ्याला 30 हजाराची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशीम यांनी रंगेहात पकडले असून त्याच्याकडून 30 हजार रुपये हस्तगत केला आहे. आशिष प्रदीप सावंगेकर वय वर्ष 30 रा पुसद, यवतमाळ असे नाव असून त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे आजीचे नावे असलेली 5 एकर शेती बक्षिस पत्रा व्दारे आजीचा पनतु यांचे नावे करण्यासाठी बक्षिस पत्र करून त्याची फेरफार ला नोंद करण्याकरिता यातील आलोसे तलाठी सावंगेकर यांनी दि.13/12/2022 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान 50,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोड अंती 41,000/-₹ स्विकारण्यास सहमती देवून पहिले 30,000/-₹ देण्याचे सांगुन फेरफार नोंद घेतल्यानंतर 11,000/-₹ देण्याचे सांगितले.
दि.14/12/2022 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान 30,000/- रु.लाच रक्कम आलोसे तलाठी आशिष सावंगेकर यांनी बळीराम नगर आमकिन्ही येथे स्विकारली. आलोसे यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून आलोसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी मा. उपविभागीय अधिकारी उपविभाग कारंजा जि वाशिम
मार्गदर्शन –
▶१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
▶️ सापळा व तपास अधिकारी
श्री.गजानन आर शेळके
पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
▶ सापळा कारवाई पथक
गजानन आर.शेळके
पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. वाशिम
पोलीस अंमलदार – पोहवा/नितिन टवलारकर, विनोद अवगळे,विनोद मारकंडे,दुर्गादास जाधव पोना/रविद्र घरत, योगेश खोटे ला.प्र.वि.वाशिम