Saturday, December 21, 2024
HomeMarathi News Todayवाशीम | मुलीच अपहरण...तब्बल ९ वर्षानंतर लागला गुन्ह्याचा छड़ा!...शिर्डीमध्ये सापडली मुलगी...काय आहे...

वाशीम | मुलीच अपहरण…तब्बल ९ वर्षानंतर लागला गुन्ह्याचा छड़ा!…शिर्डीमध्ये सापडली मुलगी…काय आहे संपूर्ण प्रकरण?…

वाशीम : अपहरण व पळवून नेलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी वाशिम पोलिसांनी विषेश मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत तब्बल नऊ वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेत. दरम्यान नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी शिर्डीमध्ये मिळून आली आहे, विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत आतापर्यत ८ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलिसांना यश आलं. पोलिसांच्या या कामगिरीचं आता सध्या सर्वत्र कौतुक होतेय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वाशिम पोलीस स्टेशन मध्ये सन २०१४ साली कळंबा महाली येथील वामन फकिरा महाले यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीला पांडुरंग गुलाबराव महाले या युवकाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान या प्रकरणात तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी अनेकदा या गुन्ह्याचा तपास केलाय मात्र त्यांच्या हाती निराशा आली. गेल्या ९ वर्षापासून याचा सुगावा सुद्धा लागत नव्हता. यासारखे अनेक गुन्हे जिल्ह्यात पेंडिंग असल्याने वाशिमचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून एक पथक गठित केलं. आणि यासारख्या गुन्ह्याचे तपास सुरू केले. तपासा दरम्यान नववर्षा आधी दाखल असलेला अपहरण गुन्ह्यातील पुन्हा मुलगी शिर्डी इथे मिळून आली.

तर मुलीला पळवून नेलेल्या युवकाला देखील पोलिसांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय वाशिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असलेली एक बालिका, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यात दाखल बेपत्ता असलेल्या तीन बालिका, मानोरा पोलीस स्टेशनमधील एक बालिका, जउळका पोलीस स्टेशन अंतर्गत एक बालिका, व कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुह्यातील एका बलिकाचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने जिल्ह्यातील ५४ मुलींपैकी ४५ मुलींचा शोध घेतला आहे. या उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, प्रभारी अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप निखाडे, विष्णू सूर्यवंशी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: