वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील येत असलेल्या साजा येवती या गावातील तलाठ्याला १ हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाशिमच्या लाचलुचपतविरोधी पथकाने कारवाई केली असून संतोष परशराम राठोड वय 54 वर्ष ,रा.तलाठी कार्यालय येवती, ता. रिसोड जि वाशिम असे लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याचे नाव असून पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे शेतात असलेल्या बोरवेल ची फेरफार घेऊन फेरफार ची प्रत देणे करिता यातील आलोसे तलाठी संतोष राठोड यांनी दि.07/01/2023 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान 1,000/- रू. लाचेची मागणी केली आलोसे यांना तक्रारदार यांचे वर संशय आल्याने तक्रारदार यांना भेट देत नसल्याने लाच मागणी कार्यवाही आलोसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶ सक्षम अधिकारी मा.उपविभागीय अधिकारी, वाशिम जि वाशिम
मार्गदर्शन –
▶१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
4)मा. श्री गजानन शेळके, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम
▶️ तपास अधिकारी
श्रीमती अफूने
पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. वाशिम.
▶️ पडताळणी पथक
पोनी महेश भोसले,
पोहवा आशिफ शेख,विनोद अवगळे, राहुल व्यवहारे, रवी घरात, दुर्गादास जाधव, बेलोकर, नितीन टवलारकर, विनोद मार्कण्ड, योगेश खोटे, उज्वल देशमुख, चालक नावेद शेख, ACB वाशिम
सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
*@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
- मोबाईल क्र.*9423338424 *